मोहित पांडे होणार राम मंदिराचा पुजारी, 3 हजार लोकांमधून करण्यात आली निवड; ‘इतका’ मिळणार पगार!

राम मंदिराच उद्घाटन 24 नोव्हेंबर 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

    अनेक दिवसापासुन देशभरीतील भाविक वाट पाहत आहे तो क्षण आता जवळ येत आहे. पुढील वर्षी 24 जानेवारीला बहुप्रतिक्षित राम मंदिराचं (Ayodhya Ram Mandir)  उद्घाटन होणार आहे.  या मंदिराचे उद्घाटन 24 नोव्हेंबर 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. 22 जानेवारी 2024 रोजी मंदिराच्या गर्भगृहात रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा होऊल. या भव्य मंदिरात पूजा करण्यासाठी 20 पुजाऱ्यांची नेमणूक करण्यात येत आहे. ही नियुक्ती मिळालेल्यांमध्ये लखनऊचा मोहित पांडेही एक आहे.

    उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यात मुख्य मंदिर दूधेश्वरनाथ आहे. या मंदिराच्या आवारात दुधेश्वर वेदविद्यापीठही आहे. देशभरातून विद्यार्थी येथे शिक्षण घेण्यासाठी येतात.सध्या येथे सुमारे 70 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पीठाधीश्‍वर श्री महंत नारायण गिरी यांनी सांगितले की, भगवान दूधेश्वरांच्या कृपेने मोहित पांडे यांची प्रभू रामाची सेवा करण्यासाठी निवड झाली. आत्तापर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी येथे वेद आणि विधींचे शिक्षण घेतले आहे. श्री दुधेश्वर वेद विद्यापीठ संस्थेत वेद शिकवले जातात. विद्यार्थ्यांना वेद शिक्षण देण्याची प्रक्रिया गेल्या २३ वर्षांपासून सुरू आहे.

    तिरुपती येथून घेतलंय उच्च शिक्षण

    मोहित पांडे यांनी प्रथम सामवेदाचं शिक्षण घेतलं आहे, त्यानंतर तिरुपती येथील वेंकटेश्वर वैदिक विद्यापीठात जाऊन शिक्षण घेतलं, आचार्य पदवी प्राप्त केल्यानंतर तो पीएचडीचीही तयारी करत असल्याचं विदयापीठाच्या आचार्यांनी सांगितले. मोहित व्यतिरिक्त, ऋषभ शर्मा आधीच तेथे पुजारी म्हणून नियुक्त झाले आहेत.