अग्नीपथ योजनेसाठी अर्जांचा पाऊस, सहा दिवसांमध्ये ‘इतक्या’ जणांची नोंदणी

एकीकडे देशात अग्निपथ योजनेला (Agneepath Scheme) विरोध होत आहे. दुसरीकडे मात्र अनेक तरुणांनी सैन्यदलात नोकरी मिळवण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. नोंदणी सुरू झाल्यानंतर फक्त सहा दिवसांमध्ये भारतीय हवाई दलाकडे (Indian Air Force) २ लाखाच्या आसपास अर्ज प्राप्त झाले आहेत.

    केंद्र सरकारने भारतीय सैन्य दलातील (Recruitment) भरतीसाठी अग्नीपथ योजनेची (Agneepath Scheme) घोषणा केली आहे. मात्र ही योजना जाहीर झाल्यानंतर देशभरातून विरोध दर्शवण्यात आला. आंदोलकांनी रेल्वेगाड्या पेटवून दिल्या. एकीकडे देशात अग्निपथ योजनेला विरोध होत आहे. दुसरीकडे मात्र अनेक तरुणांनी सैन्यदलात नोकरी मिळवण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. नोंदणी सुरू झाल्यानंतर फक्त सहा दिवसांमध्ये भारतीय हवाई दलाकडे (Indian Air Force) २ लाखाच्या आसपास अर्ज प्राप्त झाले आहेत.

    भारतीय हवाई दलाने मंगळवारी एक ट्विट करुन अग्निपथ योजनेअंतर्गत १ लाख ८३ हजार ६३४ जणांनी नोंदणी केल्याची माहिती दिली. तसेच तुम्हालाही अग्निवीर बनायचं असेल तर https://agnipathvayu.cdac.in या संकेतस्थळाला भेट देऊन नोंदणी अर्ज भरण्याचं आवाहन हवाई दलाने केलं आहे.

    या योजनेनुसार १७ आणि २१ वयोगटातील तरुणांना चार वर्षांच्या कार्यकाळासाठी सैन्यदलात भरती करून घेतले जाणार आहे. चार वर्षानंतर त्यातील २५ टक्के जवानांना नियमित सैन्यदलात सामावून घेतले जाईल, असं सरकारने स्पष्ट केलं आहे.

    देशभरातून अग्निपथ योजनेला विरोध झाल्यानंतर केंद्र सरकारने नोकरीत भरती होण्याची कमाल वयोमर्यादा २३ पर्यंत वाढवली आहे. यानंतर आता सैन्यदलाकडून भरती प्रक्रिया राबवायला सुरुवात करण्यात आली आहे. अग्निपथ योजनेसाठी पहिल्या सहा दिवसातच २ लाखाहून अधिक तरुणांनी नोंदणी केली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ जुलै २०२२ आहे.