आज चंद्रावर उगवणार सकाळ; ‘प्रज्ञान’ अॅक्टिव्ह होणार? चांद्रयान-3 मोहिमेसाठी आज महत्त्वाचा दिवस, सर्वाचे लक्ष…

आज चांद्रयान-3 मोहिमेसाठी (Chandrayaan-3) आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. प्रज्ञान रोव्हर (Pragyan Rover) आणि विक्रम लँडर (Vikram Lander) आज, शुक्रवारी इस्रोकडून (ISRO) अॅक्टिव्ह करण्यात येणार आहे.

    नवी दिल्ली : भारताने ऐतिहासिका कामगिरी करत चांद्रयान ३ यशस्वी मोहिम राबविली आहे. आता चंद्रावर विविध रहस्य आणि माहिती या यानच्या माध्यमातून मिळत आहे. भारताचे चांद्रयान ३ यशस्वीरीत्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवल्यानंतर आणि सूर्याची रहस्ये उलगडण्यासाठी भारताचे ‘आदित्य-एल-१ ’ प्रक्षेपित करण्यात आले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था आता याविषयीची पुढील विचार करत असताना, आज चांद्रयान-3 मोहिमेसाठी (Chandrayaan-3) आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. प्रज्ञान रोव्हर (Pragyan Rover) आणि विक्रम लँडर (Vikram Lander) आज, शुक्रवारी इस्रोकडून (ISRO) अॅक्टिव्ह करण्यात येणार आहे. (morning will rise on the moon today pragyan will be active today is an important day for candrayaan three mission all eyes are on)

    प्रज्ञान रोव्हर व प्रज्ञान रोव्हर अॅक्टिव्ह होणार…

    दरम्यान, ISRO (SAC) चे संचालक नीलेश देसाई यांनी गुरुवारी (21 सप्टेंबर) वृत्तसंस्था पीटीआयला सांगितले की आम्ही 22 सप्टेंबर रोजी लँडर आणि रोव्हर दोन्ही सक्रिय करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता, 16 दिवसांच्या स्लीप मोडनंतर प्रज्ञान रोव्हर (Pragyan Rover) आणि विक्रम लँडर (Vikram Lander) आज, शुक्रवारी इस्रोकडून (ISRO) अॅक्टिव्ह करण्यात येणार आहे. चंद्रावर सूर्यप्रकाश येणार असल्याने लँडर आणि रोव्हरवरील सोलर पॅनेल चार्ज होण्याची शक्यता आहे.

    सगळं काही जुळून आल्यास प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडर अॅक्टिव्ह होतील. तसे झाल्यास आपल्याला चंद्राच्या पृष्ठभागावरील आणखी माहिती मिळण्यास मदत होईल. याचा फायदा चंद्राच्या संशोधनात होईल, तसेच अंतराळ विज्ञानाच्या इतिहासात पहिल्यांदा चांद्रयान-3 ने (Chandrayaan-3) चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील (Moon South Pole) मातीचे परीक्षण केले. लँडर आणि रोव्हर दोन्ही स्लीप मोडवर ठेवले होते.