खासदार स्वामींनी जाहिर केलं मोदींचं रिपोर्ट कार्ड; म्हणाले, सरकार जनतेचे प्रश्न सोडवण्यात अपयशी

मोदी सरकार अर्थव्यवस्था, सीमा सुरक्षेतही नापास झाल्याचं सुब्रहमण्यम स्वामी म्हणाले. तसंच अफगाणिस्तानमधील संकट भारत सरकारने ज्याप्रकारे हाताळलं ते गोंधळ निर्माण करणारं असल्याचं ते म्हणाले आहेत. याशिवाय पेगॅसस सुरक्षा त्रुटीसाठीही त्यांनी मोदी सरकारलाच जबाबदार धरल्याचं दिसत आहे. अंतर्गत सुरक्षेच्या मुद्द्यावरुन त्यांनी काश्मीरचं उदाहरण दिलं असून या सर्वांसाठी आपण जबाबदार असल्याचा टोलाही लगावला आहे. गेल्या वर्षी जेव्हा भाजप आणि तृणमूल काँग्रेसमधील राजकीय लढाई शिगेला पोहोचली होती, तेव्हा सुब्रमण्यम स्वामी यांनी ममता बॅनर्जी यांना 'खऱ्या हिंदू आणि दुर्गा भक्त' असं म्हटलं होतं.

    भारतीय जनता पक्षाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी सध्या चर्चेत आहेत. बुधवारी त्यांनी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. या भेटीपासून स्वामींचा दृष्टिकोन काहीसा बदलला आहे. या क्रमाने, आज त्यांनी मोदी सरकारचे रिपोर्ट कार्ड सादर केले आहे, ज्यामध्ये त्यांनी जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजप सरकार पूर्णपणे अपयशी असल्याचे मान्य केले आहे.

    बुधवारी (24 नोव्हेंबर) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना भेटल्यानंतर सुब्रमण्यम स्वामी यांनी ममता बॅनर्जी यांच्याबद्दल ट्वीट करत त्यांचे कौतुक केले. त्यानी ट्विटमध्ये लिहीले की, ‘मी आत्तापर्यंत ज्या नेत्यांसोबत काम केलंय अथवा भेटलोय त्यामध्ये ममता बॅनर्जी या मोरारजी देसाई, जेपी, राजीव गांधी, चंद्रशेखर आणि पीवी नरसिम्हा राव या नेत्यांसारख्या आहेत, ज्यांच्या बोलण्यात आणि कृतीमध्ये फरक नाहिये.’

    मोदी सरकार अर्थव्यवस्था, सीमा सुरक्षेतही नापास झाल्याचं सुब्रहमण्यम स्वामी म्हणाले. तसंच अफगाणिस्तानमधील संकट भारत सरकारने ज्याप्रकारे हाताळलं ते गोंधळ निर्माण करणारं असल्याचं ते म्हणाले आहेत. याशिवाय पेगॅसस सुरक्षा त्रुटीसाठीही त्यांनी मोदी सरकारलाच जबाबदार धरल्याचं दिसत आहे. अंतर्गत सुरक्षेच्या मुद्द्यावरुन त्यांनी काश्मीरचं उदाहरण दिलं असून या सर्वांसाठी आपण जबाबदार असल्याचा टोलाही लगावला आहे.

    गेल्या वर्षी जेव्हा भाजप आणि तृणमूल काँग्रेसमधील राजकीय लढाई शिगेला पोहोचली होती, तेव्हा सुब्रमण्यम स्वामी यांनी ममता बॅनर्जी यांना ‘खऱ्या हिंदू आणि दुर्गा भक्त’ असं म्हटलं होतं.

    त्यामुळे आता स्वपक्षावर नाराज असलेले सुब्रमण्यम स्वामी भारतीय जनता पक्ष सोडतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.