mukhtar ansari

कुख्यात गुंड, माफिया अतिक अहमद (Atique Ahmed) आणि त्याचा भाऊ अशरफ (Ashraf) याची कॅमेऱ्यासमोर हत्या करण्यात आली. तीन हल्लेखोरांनी ‘ऑन कॅमेऱ्या’समोर बेछूट गोळीबार केला. यामध्ये दोघेही जागीच मृत पावले. या घटनेनंतर देशभरात एकच चर्चा सुरु आहे.

  गाझीपूर : कुख्यात गुंड, माफिया अतिक अहमद (Atique Ahmed) आणि त्याचा भाऊ अशरफ (Ashraf) याची कॅमेऱ्यासमोर हत्या करण्यात आली. तीन हल्लेखोरांनी ‘ऑन कॅमेऱ्या’समोर बेछूट गोळीबार केला. यामध्ये दोघेही जागीच मृत पावले. या घटनेनंतर देशभरात एकच चर्चा सुरु आहे. त्यात आता माफिया मुख्तार अन्सारीच्या (Mukhtar Ansari) कारनाम्याची चर्चा सुरु आहे.

  गाझीपूरच्या एमपीएमएलए न्यायालयाने 17 मे रोजी हत्येच्या प्रयत्नाच्या खटल्यातून माफिया मुख्तार अन्सारीला निर्दोष मुक्त केले. 2009 मध्येच गाझीपूरमध्ये कपिल देव सिंह यांची हत्या झाली होती. याप्रकरणी मुख्तार याच्यावर कट रचल्याचा आरोप आहे. पण या प्रकरणाचा निकाल 20 मे रोजी येणार आहे. तत्पूर्वी मुख्तारबाबत अनेक बाबी समोर आल्या आहेत. मुख्तार याच्या टोळीत अनुज, अंगद आणि अमित असे शूटर्स आहेत.

  मुख्तार शूटर्सना ठेवायचा पगारावर

  उत्तर प्रदेश पोलिस अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली की, पूर्वांचलमध्ये वर्चस्व गाजवण्यासाठी मुख्तारने शूटर्सना पगारावर ठेवण्यास सुरुवात केली. त्यांना त्यांच्या कामानुसार दर महिन्याला पैसे द्यायचा. एखाद्या गुन्ह्यानंतर हल्लेखोर पसार झाले तर त्यांच्या खाण्याचा-राहण्याचा खर्चही मुख्तार अन्सारी करत असे.

  स्वतःच्या जीवावर बेतलं…

  अनुज हा मुख्तार अन्सारीच्या टोळीतील शूटर्सपैकी एक. अनुजच्या भावाने अनुज गुन्हेगारी विश्वात कसा गेला याची माहिती दिली. 7 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. 30 जून 2004 रोजी मोठा भाऊ गाझीपूर कोर्टात तारखेला जात होता. गावापासून काही अंतरावर त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्याला त्याच्या भावाच्या हत्येचा बदला घ्यायचा होता. त्यातूनच त्याने गुन्हेगारी विश्वात पाऊल ठेवले.