मुख्तार अन्सारीचा शूटर जीवाची कोर्टातच गोळ्या झाडून हत्या; हल्लेखोर आले होते वकिलाच्या वेशात

कैसरबाग कोर्ट परिसरात गगस्टर संजीव महेश्वरी जीवाची (Maheshwari Jiva) गोळ्या घालून हत्या करण्यात आली. हल्लेखोर वकिलाच्या वेशभूषेत येथे आला होता. तो मुख्तार अन्सारीचा (Mukhtar Ansari) निकटवर्तीय होता. त्याच्यावर भाजप नेते ब्रह्मदत्त द्विवेदी यांच्या हत्येचा आरोप होता.

    लखनौ : कैसरबाग कोर्ट परिसरात गगस्टर संजीव महेश्वरी जीवाची (Sanjiv Maheshwari Jiva) गोळ्या घालून हत्या करण्यात आली. हल्लेखोर वकिलाच्या वेशभूषेत येथे आला होता. तो मुख्तार अन्सारीचा (Mukhtar Ansari) निकटवर्तीय होता. त्याच्यावर भाजप नेते ब्रह्मदत्त द्विवेदी यांच्या हत्येचा आरोप होता. कोर्ट परिसरात झालेल्या या गोळीबारात पाच अन्यही जखमी झाले.

    संजीव हा पश्चिम उत्तर प्रदेशातील कुख्यात गँगस्टर होता. या प्रकरणी पोलिसांनी एका हल्लेखोराला ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर कोर्ट परिसरात दहशत पसरली होती. वकिलांनीही दिवसाढवळ्या झालेल्या गोळीबारावर चिंता व्यक्त केली. हल्लेखोराने संजीववर हल्ला केला. घटनेनंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला.

    दोन डझन खटले दाखल

    संजीववर दोन डझन खटलेही दाखल होते. त्यापैकी 17 प्रकरणात संजीवची सुटका करण्यात आली आहे. त्याच्या टोळीत 35 सदस्य असल्याचे समजते. संजीववर कारागृहात असतानाही गँग ऑपरेट केल्याचा आरोप होता. काही दिवसांपूर्वीच त्याची मालमत्ता प्रशासनाने जप्त केली होती.