रॉबिनहूड नावानं ओळखले जात होते मुख्तार अन्सारी; कोणी दिलं नाव, काय आहे त्यामागचं कारण!

उत्तर प्रदेशातील गँगस्टर-राजकारणी मुख्तार अन्सारी यांचे गेल्या गुरुवारी (28 मार्च) रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांचे वय 63 वर्षे होते. मुख्तार अन्सारी यांचा उत्तर प्रदेशातील बांदा येथील रुग्णालयात मृत्यू झाला.

    उत्तर प्रदेशातील गँगस्टर-राजकारणी मुख्तार अन्सारी (Mukhtar Ansari) यांचे गेल्या गुरुवारी (28 मार्च) रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या 63 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गँगस्टर-राजकारणी होण्याच्या त्यांच्या प्रवासात ते उत्तरप्रदेशचे शक्तिशाली नेते बनले. ज्याची संपूर्ण पूर्वांचलमध्ये भीती होती. त्यामुळे उत्तर प्रदेशातील अनेक राजकारणी त्यांना वेगवेगळ्या नावांनी हाक मारायचे. त्यांना उत्तर प्रदेशातील नेते रॉबिन हूड म्हणत होते. पण का पडलं त्यांना हे नाव महित आहे का?

    मुख्तार अंसारी यांना रॅाबिन हूड का म्हणत

    उत्तर प्रदेशातील गुंड-राजकारणी मुख्तार अन्सारी याला उत्तर प्रदेशचे नेते रॉबिन हूड म्हणत असल्याची कथा खूप रंजक आहे. 2009 मध्ये यूपीमध्ये एका सभेत तत्कालीन मुख्यमंत्री मायावती काँग्रेस पक्षावर टिका करत होत्या तेव्हापासून त्याची सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी काँग्रेसचे तत्कालीन सरचिटणीस राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधत मुख्तार अन्सारी यांना खोट्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले. असे केल्याने कोणीही गुन्हेगार होत नाही. गरीबांना मदत करणारा तो रॉबिन हूड आहे. मुख्तार हा पीडित असून मी त्याला निर्दोष मानते, असे मायावती म्हणाल्या होत्या.

    स्वातंत्र्य सैनिकाच्या कुटुंबात जन्मले होते मुख्तार अन्सारी

    मुख्तार अन्सारी यांचा जन्म 30 जून 1963 रोजी उत्तर प्रदेशातील युसूफपूर येथे झाला. त्यांचा जन्म भारतीय स्वातंत्र्यलढ्यांशी निगडित असलेल्या कुटुंबात झाला. त्यांचे आजोबा मुख्तार अहमद अन्सारी हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांपैकी एक होते आणि त्यांनी 1927 मध्ये पक्षाचे अध्यक्ष म्हणूनही काम केले होते. त्यांचे आजोबा, ब्रिगेडियर मोहम्मद उस्मान यांनी भारतीय सैन्यात सेवा केली आणि काश्मीरमधील नौशेरा येथे कर्तव्य बजावताना त्यांचा मृत्यू झाला. ते मढचे पाचवेळा आमदार होते. त्याच्यावर 65 खटले प्रलंबित होते.