राष्ट्राध्यक्ष Joe Biden यांनी सांगीतला मुंबईतील पत्रकारांचा किस्सा, बायडेन म्हणतात..

    पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी काल शुक्रवारी व्हाइट हाऊसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची भेट घेतली. या भेटील पंतप्रधान मोदी व राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्यात चर्चा रंगलेली दिसली. याच चर्चे दरम्यान बायडेन यांनी त्यांच्या मुंबई दौऱ्यातील पत्रकारांचा एक किस्सा सांगीतला.

    राष्ट्राध्यक्ष बायडेन म्हणाले की, ‘मला पक्कं आठवत नाही पण मी १९७२ साली वयाच्या २८ व्या वर्षी सिनेटर म्हणून निवडून आलो तेव्हा मी शपथ घेण्याआधी मला मुंबईमधून बायडेन नावाच्या एका व्यक्तीचं पत्र आलं होतं. मला नंतर त्याच्याशी संवाद साधता आला नाही. पुढच्या दिवशी पत्रकार परिषदेमध्ये भारतीय पत्रकारांनी भारतात पाच बायडेन असल्याची माहिती दिली.’

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी पहिल्या द्विपक्षीय थेट बैठकीदरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांना सांगितलं की, त्यांनी भारतामध्ये बायडेन ‘आडनाव’ बाळगलेले आहेत हे सिद्ध करण्यासाठी कागदपत्रे आणली आहेत. दोन्ही नेत्यांनी व्हाईट हाऊसमध्ये या विषयावर मजेदार पद्धतीने चर्चा केली. जेव्हा बायडेन यांनी विचारलं की, ते भारतात राहणाऱ्या बायडेन आडनाव असलेल्या लोकांशी संबंधित आहेत का, तेव्हा पंतप्रधान मोदींनी ‘होय’ असे उत्तर दिले.