50 years of rajdhani express

मुंबई-नवी दिल्ली राजधानी एक्स्प्रेसने ५० वर्षे पूर्ण (50 Years Of Mumbai-Delhi Rajdhani Express) केली आहेत. यानिमित्त पश्चिम रेल्वेने (Western Railway) ट्विट केले आहे.

  ​​भारतीय रेल्वेला (Indian Railway) १६९ वर्षांचा इतिहास आहे. वाफेच्या इंजिनापासून ते बुलेट ट्रेनपर्यंत आता रेल्वेची प्रगती पोहोचली आहे.अशातच देशातील प्रिमियम पॅसेंजर ट्रेन मुंबई-नवी दिल्ली राजधानी एक्स्प्रेसने ५० वर्षे पूर्ण (50 Years Of Mumbai-Delhi Rajdhani Express) केली आहेत. यानिमित्त पश्चिम रेल्वेने (Western Railway) ट्विट केले आहे.

  पश्चिम रेल्वेची प्रतिष्ठित ट्रेन मुंबई-नवी दिल्ली राजधानी एक्स्प्रेसने आज आपल्या प्रवासाला 50 वर्षे पूर्ण केली आहेत. भारतीय रेल्वे आणि आपल्या सर्वांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे. असं पश्चिम रेल्वेच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

  बॉम्बे सेंट्रल ते राजधानी असा प्रवास १७ मे रोजी १९७२ रोजी रेल्वेने सुरू केला. भारतातील पहिली संपूर्ण वातानुकूलित ट्रेन नवी दिल्ली आणि हावडा दरम्यान धावली. पूर्वी मुंबईहून दिल्लीला जाण्यासाठी फ्रंटियर मेल आणि पश्चिम एक्स्प्रेससारख्या इतर गाड्या होत्या. आता राजधानी एक्स्प्रेसच्या २५ गाड्या रेल्वेच्या ताफ्यात आहेत.

  पश्चिम रेल्वेचे सीपीआरओ सुमित ठाकूर यांच्या मते, भारताची ही प्रमुख ट्रेन देशाच्या राजधानीशी जोडण्यासाठी सुरू करण्यात आली होती. मुंबई-दिल्ली राजधानी एक्स्प्रेसच्या ५० वर्षांमध्ये या मार्गांवर आणखी दोन राजधानी एक्स्प्रेस (शताब्दी), तसेत फुल एसी गाड्या जसे की गरीब रथ, युवा एक्स्प्रेस आणि दुरंतो एक्सप्रेस जोडल्या गेल्या आहेत. दरम्यान, राजधानी एक्स्प्रेसने भारतीय रेल्वे ट्रॅकवर आपली मजबूत पकड राखून ठेवली आबे.
  आजही राजधानी एक्सप्रेस ही प्रवाशांमध्ये सर्वात लोकप्रिय रेल्वे आहे.

  मुंबई आणि दिल्ली दरम्यान १९ तास ५ मिनिटांपेक्षा जास्त कालावधीचा प्रवास १५ तास ५० मिनिटांपर्यंत कमी झाला आहे. भविष्यात प्रवासाचा वेळ आणखी कमी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. असं रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे. राजधानी ही १९८८ पर्यंत भारतीय रेल्वेमधील सर्वात वेगवान ट्रेन होती, ज्याचा कमाल वेग १२० किमी प्रतितास होता. आता आधुनिक वंदे भारत आणि शताब्दी गाड्या वेगाने धावतात. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पुढील चार वर्षांत ट्रॅक अपग्रेडेशनमुळे राजधानी १६० किमी प्रतितास वेगाने धावू शकेल. यामुळे प्रवासाचा वेळ १२ तासांपर्यंत कमी होईल.