मुस्लिम मुली 16 व्या वर्षी करू शकतात लग्न; पंजाब-हरयाणा हायकोर्टाचा निर्णय

पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने प्रेमविवाह प्रकरणात 16 वर्षीय मुस्लिम मुलीचा विवाह कायदेशीररित्या वैध ठरवला आहे. 16 आणि 21 वर्षे वयाच्या मुस्लिम जोडप्याला त्यांच्या कुटुंबातील सदस्यांपासून संरक्षण देत, उच्च न्यायालयाने सोमवारी निर्णय दिला की, 16 वर्षांपेक्षा जास्त वयाची मुस्लिम मुलगी तिच्या पसंतीच्या व्यक्तीसोबत विवाह करू शकते. न्या. जसजित सिंग बेदी यांच्या एका न्यायाधीशांच्या खंडपीठाने पठाणकोटमधील एका मुस्लिम जोडप्याच्या याचिकेवर हा आदेश दिला(Muslim girls can marry at the age of 16; Punjab-Haryana High Court decision).

    चंदीगड : पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने प्रेमविवाह प्रकरणात 16 वर्षीय मुस्लिम मुलीचा विवाह कायदेशीररित्या वैध ठरवला आहे. 16 आणि 21 वर्षे वयाच्या मुस्लिम जोडप्याला त्यांच्या कुटुंबातील सदस्यांपासून संरक्षण देत, उच्च न्यायालयाने सोमवारी निर्णय दिला की, 16 वर्षांपेक्षा जास्त वयाची मुस्लिम मुलगी तिच्या पसंतीच्या व्यक्तीसोबत विवाह करू शकते. न्या. जसजित सिंग बेदी यांच्या एका न्यायाधीशांच्या खंडपीठाने पठाणकोटमधील एका मुस्लिम जोडप्याच्या याचिकेवर हा आदेश दिला(Muslim girls can marry at the age of 16; Punjab-Haryana High Court decision).

    केवळ याचिकाकर्त्यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या इच्छेविरुद्ध लग्न केल्यामुळे, त्यांना भारतीय राज्यघटनेत नमूद केल्यानुसार त्यांच्या मूलभूत अधिकारांपासून वंचित ठेवता येणार नाही.

    न्या. बेदी यांनी निकालावेळी इस्लामिक शरिया नियमांचा दाखला दिला. मुस्लिम मुलीचे लग्न मुस्लिम वैयक्तिक कायद्यानुसार चालते. सर दिनशाह फरदुनजी मुल्ला यांच्या प्रिन्सिपल्स ऑफ मोहम्मडन लॉ या पुस्तकातील कलम 195 नुसार, याचिकाकर्ता क्रमांक 2 (मुलगी) 16 वर्षांपेक्षा जास्त वयाची असल्याने ती तिच्या पसंतीच्या व्यक्तीसोबत विवाह करार करू शकते. याचिकाकर्ता क्रमांक 1 (मुलगा) 21 वर्षांपेक्षा जास्त वयाचा असल्याचे नमूद केले आहे. अशा प्रकारे, दोन्ही याचिकाकर्ते मुस्लिम वैयक्तिक कायद्यानुसार विवाह करण्यायोग्य वयाचे आहेत.

    दरम्यान, याचिकाकर्त्यांच्या भीतीकडे लक्ष देणे आवश्यक आहे या वस्तुस्थितीकडे डोळे झाक करता येणार नाही. त्यांनी एसएसपी पठाणकोट यांना या जोडप्याला योग्य सुरक्षा देण्याचे आणि कायद्यानुसार आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.