कारगिलमधील बौद्ध पदयात्रेला मुस्लीम संघटनांचा विरोध

    धर्मगुरु (Dhamaguru) चोस्क्योंग पल्गा रिनपोचे (Choskyong Palga Rinpoche) त्यांच्या अनुयायांसह कारगील (Kargil) येथून प्रवास करत आहेत. कारगिलमधील एका वादग्रस्त जागेवर मठाचा (Monastery) दगड ठेवण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. यावर मुस्लीम समाजा(Muslim Community)तील काही सदस्यांनी आक्षेप (Objection) घेतला आहे. यामुळे पर्यावरण बिघडू शकते, असे त्यांचे म्हणणे आहे.

    प्रत्यक्षात कारगिल जिल्हा मुख्यालयातील बौद्ध विहाराकडे निघालेल्या या शांतता मोर्चाबाबत तणावासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. डेली ट्रिब्यूनमधील वृत्तानुसार, कारगिल डेमोक्रेटिक अलायन्सच्या बॅनरखाली अनेक इस्लामिक संघटनांनी (Islamic Organizations) शांतता मोर्चाला कायदा आणि सुव्यवस्थेसाठी धोका असल्याचे म्हटले आहे. राजकीय हेतूने ही पदयात्रा काढली जात असून त्यामुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते, असा इशाराही इस्लामी संघटनांनी जिल्हा प्रशासनाला निवेदनाव्दारे दिला आहे.

    पदयात्रेला बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय
    लेह(Leh)मधून निघालेला शांतता मोर्चा (Peace March) कारगिलजवळील मुलबेख मुख्यालयात पोहोचला असून कारगिलला पोहोचेपर्यंत त्यात बौद्ध समाजातील सुमारे एक हजार लोक उपस्थित असणार आहेत. ही यात्रा ३१ मे रोजी सुरू झाली असून १४ जून रोजी मुस्लिमबहुल कारगिलमध्ये संपणार आहे. कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्स (KDA) या सामाजिक आणि धार्मिक संघटनेने उपायुक्तांना पत्र लिहिले असून त्यात हा मोर्चा राजकीय हेतूने प्रेरित असून लडाखमधील जातीय सलोखा बिघडू शकतो. मात्र, लडाख बुद्धिस्ट असोसिएशनच्या (Ladakh Buddhist Association) कारगिल शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी शांतता पदयात्रेबाबत चर्चा करून पदयात्रेला बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.