“तुम्हा सर्वांना माझा सलाम, तुमच्या प्रचंड मेहनतीला सलाम…, हा नवा आणि निर्भिड भारत आहे, नवे स्वप्न नव्या पद्धतीने पाहणारा भारत”

हा आजचा भारत आहे, निर्भिड भारत. नवे स्वप्न नव्या पद्धतीने पाहणारा हा भारत आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. हे जगाने केले नाही ते भारताने केले आहे. आज भारताकेड संपूर्ण जग कौतुकाने पाहत आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

  बंगळुरू – भारताने २३ ऑगस्टला ऐतिहासिका कामगिरी केली आहे. चांद्रयान ३ (chandrayan 3) हे भारताचे यान यशस्वीरित्या चंद्रावर पोहचले आहे. यामुळं सर्व जगाने भारताचे कौतुक केले आहे. दरम्यान, आज परेदश दौऱ्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे भारतात परत येताच, बंगळुरात नागरिकांशी संवाद साधला. दरम्यान, यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्रोच्या कार्यालयात जात शास्त्रज्ञांची भेट घेत, त्यांचे अभिनंदन केले. तसेच या मोहीमेबद्दल जाणून घेतले. यावेळी त्यांनी बंगळुरात इस्त्रोच्या (ISRO) शास्त्रज्ञांशी संवाद साधला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रो सेंटरमध्ये पोहोचले आहेत. यावेळी त्यांचं स्वागत करण्यात आलं. तर मोदी यांनीही प्रत्येक शास्त्रज्ञांचं अभिनंदन करतानाच त्यांच्याशी चर्चाही केली. इस्रो सेंटरमधील विक्रम लँडरच्या प्रतिकृतीही त्यांनी पाहिल्या आणि त्याचीही माहिती घेतली. (My salute to all of you, salute to your hard work…, this is a new and fearless India, a new dreaming India in a new way)

  तुमच्या कार्याला माझा सलाम…सलाम

  दरम्यान, यावेळी मोदींनी शास्त्रज्ञांनी संवाद साधताना सर्वात आधी सर्वाचे अभिनंदन केले. तुम्हा सर्वांना मला सॅल्यूट करायचा आहे, तुमच्या परीश्रमाला हा सॅल्यूट आहे, असं मोदी म्हणाले.
  मी दक्षिण आफ्रिकेत होतं. पण माझं मन तुमच्याकडे लागून राहिलेलं होतं. इस्रो सेंटरमध्ये आल्यावर मला वेगळाच आनंद वाटत आहे. भारतात येऊन लवकरात लवकर तुमचं दर्शन घ्यायचं होतं. तुम्हा सर्वांना मी सॅल्यूट करतो, मी कधी एकदा भारतात परत येतोय, आणि तुम्हाला येऊन भेटतो, असे झाले होते, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

  हा नवा भारत…निर्भिड भारत.. नवे स्वप्न पाहणारा भारत

  तुम्ही चंद्रयान मोहीम यशस्वी केली ही साधी गोष्ट नाही. ही फार मोठी गोष्ट आहे. भारत आज चंद्रावर आहे ही मोओठी अभिमानाची गोष्ट आहे. हा आपल्या देश गौरवाचा क्षण आहे. जिथे कोणीच गेलं नाही तिथे आपण पोहोचलो आहोत. कुणी केलं नाही केलं ते आपण केलं. हा आजचा भारत आहे, निर्भिड भारत. नवे स्वप्न नव्या पद्धतीने पाहणारा हा भारत आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. हे जगाने केले नाही ते भारताने केले आहे. आज भारताकेड संपूर्ण जग कौतुकाने पाहत आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

  जय जवान, जय विज्ञानचा नारा…

  दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  बंगळुरात आपल्या छोटेखानी भाषणात “जय जवान…, जय विज्ञान..’ असा नारा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बंगळुरूत मोठी रॅली निघाली आहे. यावेळी त्यांनी देशातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मला इस्रोचा आणि वैज्ञानिकांचा  खूप अभिमान वाटत आहे, असं म्हटलं. तुम्ही सकाळी आला, लहान मुल आली. ही मुलं देशाचे भविष्य आहेत, असं मोदी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जय जवान, जय विज्ञान, जय अनुसंधानचा नारा दिला. तसेच भारत माता की जयच्याही घोषणा दिल्या.