
डॉक्युमेंटरीचे व्हिडिओ आपल्या प्लॅटफॉर्मवर अपलोड झाल्यास ब्लॉक करण्याचे निर्देश यूट्यूबने दिले आहेत. तर ट्विटरनेदेखील डॉक्युमेंटरीच्या व्हिडिओ लिंक्स असलेले ट्विट ओळखून ब्लॉक करण्याच्या सूचना दिल्या आहेत. डॉक्युमेंटरीचे यूट्यूबवर शेअर केलेले सर्व व्हिडिओ ब्लॉक करण्याचे आदेश दिले आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने हे निर्देश जारी केले आहेत. 'इंडिया: द मोदी क्वेश्चन’ या बीबीसी डॉक्युमेंटरीच्या यूट्यूब व्हिडीओच्या लिंक असलेल्या 50 हून अधिक ट्विट ब्लॉक करण्याचे आदेश ट्विटरला देण्यात आले आहेत.
नवी दिल्ली – ‘इंडिया: द मोदी क्वेश्चन’ नावाची एक डॉक्युमेंटरी बीबीसीने प्रकाशित केली आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर यांच्या कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात असून 2002 च्या गुजरात दंगलीबाबत अनेक वादग्रस्त दावे करण्यात आले आहेत. यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. केंद्र सरकारने बीबीसीची ही डॉक्युमेंटरी शेअर करणारे ट्विटवर अकाउंट ब्लॉक करण्याचे आदेश दिले आहेत. बीबीसीने ही डॉक्युमेंटरी भारतात प्रकाशित केली नाही. तर काही युट्युब चॅनलद्वारे डॉक्युमेंटरी अपलोड करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिमा खराब करण्याचा याद्वारे प्रयत्न करण्यात आल्याचे तपासणीत आढळून आले, असे सरकारने म्हटले.
डॉक्युमेंटरीचे व्हिडिओ आपल्या प्लॅटफॉर्मवर अपलोड झाल्यास ब्लॉक करण्याचे निर्देश यूट्यूबने दिले आहेत. तर ट्विटरनेदेखील डॉक्युमेंटरीच्या व्हिडिओ लिंक्स असलेले ट्विट ओळखून ब्लॉक करण्याच्या सूचना दिल्या आहेत. डॉक्युमेंटरीचे यूट्यूबवर शेअर केलेले सर्व व्हिडिओ ब्लॉक करण्याचे आदेश दिले आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने हे निर्देश जारी केले आहेत. ‘इंडिया: द मोदी क्वेश्चन’ या बीबीसी डॉक्युमेंटरीच्या यूट्यूब व्हिडीओच्या लिंक असलेल्या 50 हून अधिक ट्विट ब्लॉक करण्याचे आदेश ट्विटरला देण्यात आले आहेत.
आयटी नियम 2021 अंतर्गत आणीबाणीच्या अधिकारांचा वापर करताना या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीसंदर्भातील ही डॉक्युमेंट्री ब्रिटनची सार्वजनिक प्रसारक ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन (BBC) ने बनवली आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने वस्तुनिष्ठतेचा अभाव आणि “प्रपोगंडाचा एक भाग” असे डॉक्युमेंट्रीचे वर्णन केले आहे.