लवकरच येणार नेझल कोरोना वॅक्सिन

देशासह जगभरात कोरोनाचा (Corona) संसर्ग (Infection) कायम आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणावर (Preventive Vaccination) भर दिला जात आहे. लवकरच कोरोनाची नेझल वॅक्सिन (Nasal Vaccine) म्हणजेच नाकावाटे घेण्यात येणारी लस येणार आहे.

    देशासह जगभरात कोरोनाचा (Corona) संसर्ग (Infection) कायम आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणावर (Preventive Vaccination) भर दिला जात आहे. लवकरच कोरोनाची नेझल वॅक्सिन (Nasal Vaccine) म्हणजेच नाकावाटे घेण्यात येणारी लस येणार आहे. भारत बायोटेकचे (Bharat Biotech) अध्यक्ष डॉ. कृष्णा एला यांनी यासंदर्भात माहिती दिली. त्यांनी सांगितले की, नेझल वॅक्सिनची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी पूर्ण झाली आहे. पुढील महिन्यात कंपनी नेझल वॅक्सिनची माहिती भारतीय औषध नियामक मंडळाकडे (DGCI) सादर करणार आहे.

    डॉ. एला पुढे म्हणाले की, आम्ही सध्या नेझल वॅक्सिनची एक चाचणी पूर्ण केली असून सध्या माहितीचे विश्लेषण सुरु आहे. पुढील महिन्यात यासंदर्भातील माहिती डीजीसीआयकडे सुपुर्द करण्यात येईल. सर्व योग्यप्रकारे झाल्यावर डीजीसीआयकडून परवानगी मिळण्याची शक्यता आहे. या लसीला मान्यता मिळाल्यास ही जगातील पहिली नेझल वॅक्सिन ठरेल, असेही त्यांनी सांगितले.

    पॅरिसमध्ये डॉ. एला यांनी व्हिवा टेक्नॉलॉजी २०२२ कार्यक्रमामध्ये भाग घेतला. यावेळी त्यांनी नेझल वॅक्सिन संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले, ज्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा दुसरा डोस घेतला आहे त्यांनी बूस्टर डोस घेणे आवश्यक आहे. भारतीय औषध नियामक मंडळाने या वर्षी जानेवारीमध्ये भारत बायोटेकला नेझल वॅक्सिनवरील तिसऱ्या चाचणीसाठी परवानगी दिली. कोरोना लसीचा बूस्टर डोस रोग प्रतिकारशक्ती निर्माण करतो. त्यामुळे बूस्टर डोस हा प्रत्येक लसीकरणासाठी चमत्कारिक डोस असतो. मुलांमध्येही दोन डोस जास्त प्रतिकारशक्ती देत ​​नाहीत, परंतु बूस्टर डोस मुलांसाठी खूप प्रभावी आहे.