medicine

सध्या डॉक्टरांनी रुग्णांना जेनेरिक औषधे लिहून देणे आवश्यक असले तरी, याबाबत काही नियमही नव्हता. ही बाब लक्षात घेत एनएमसीने जेनेरिक औषधे प्रिस्क्राइब करण्यासाठी नवा नियम लागू केला आहे. 

  नवी दिल्ली : राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (NMC) डॉक्टरांसाठी काही नवीन नियम लागू केले आहेत. यानुसार रुग्णांना जेनेरिक औषधे प्रीस्क्राइब न केल्यास डॉक्टरांवर कारवाई होऊ शकते. डॉक्टरांनी रुग्णांना जेनेरिक औषध (Generic Medicine) देण्यावर अधिक भर द्यावा, यासाठी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने नवीन नियम लागू केले आहेत.

  सध्या डॉक्टरांनी रुग्णांना जेनेरिक औषधे लिहून देणे आवश्यक असले तरी, याबाबत काही नियमही नव्हता. ही बाब लक्षात घेत एनएमसीने जेनेरिक औषधे प्रिस्क्राइब करण्यासाठी नवा नियम लागू केला आहे.

  …तर डॉक्टरवर कारवाई

  डॉक्टरांना आता जेनेरिक औषधे लिहून देणे बंधनकारक असले तरी २००२ मध्ये एनएमसीने जारी केलेल्या नियमांमध्ये कोणतीही दंडात्मक तरतूद नमूद केलेली नाही. मात्र, आता संबंधात नवीन नियमावली जारी करण्यात आली असून, संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्यात येईल. तसेच त्या डॉक्टरांचं लायसन्स रद्द होऊ शकते.

  ब्रँडेड जेनेरिक औषधे लिहिणे टाळावे

  राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या नवीन नियमानुसार, आता डॉक्टरांना प्रिस्क्रिप्शन लिहून देताना जेनेरिक औषधं लिहून द्यावी लागतील. तसेच कोणतीही ब्रँडेड जेनेरिक औषधं लिहिणं टाळावं लागणार आहे. याचाच सोपा अर्थ म्हणजे डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शन लिहिताना संबंधित आजारावर रुग्णांना कोणता औषधाचा फॉर्म्युला आवश्यक आहे. फक्त याचा उल्लेख करावा. कोणत्याही जेनरिक औषधांच्या ब्रँडचा उल्लेख करुन नये. डॉक्टरांना आता हे नियम पाळावे लागणार आहेत.