अनिल परब यांचे 15 फ्लॅट आहेत ठाकरे सरकारला फक्त माझाच फ्लॅट दिसला का? राणा दाम्पत्याचे शरसंधान

मुंबईत रवी यांच्या खार येथील राहत्या फ्लॅटला महानगरपालिकेने जारी केलेल्या नोटीसवरुन राणांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मुंबईत माझा तर एकच फ्लॅट आहे. पण अनिल परब यांचे 15 फ्लॅट आहेत. ठाकरे सरकारला फक्त माझाच फ्लॅट दिसला, असा आरोप रवी यांनी केला(Navneet and Ravi Rana criticize Thackeray government).

  दिल्ली : मुंबईत रवी यांच्या खार येथील राहत्या फ्लॅटला महानगरपालिकेने जारी केलेल्या नोटीसवरुन राणांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मुंबईत माझा तर एकच फ्लॅट आहे. पण अनिल परब यांचे 15 फ्लॅट आहेत. ठाकरे सरकारला फक्त माझाच फ्लॅट दिसला, असा आरोप रवी यांनी केला(Navneet and Ravi Rana criticize Thackeray government).

  अमरावतीचे खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती बडेनराचे आमदार रवी राणा यांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर पुन्हा एकदा शरसंधान साधले.

  उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून महाराष्ट्राची दशा झाली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नावावर मते मागितली, पण सत्ता मात्र दुसऱ्यासोबत स्थापन केली. राज्यात बाळासाहेबांच्या विचारांची हत्या करण्यात आली आहे, अशी टीकाही रवी राणा यांनी यावेळी केली. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या शिवसेनेची ‘सुलेमान सेना’ करुन टाकली, अशा शब्दात रवी राणा यांनी हल्लाबोल केला.

  उद्धव ठाकरेंची 14 मे रोजी सभा आहे. त्यात ते नक्कीच आम्ही मर्द आहोत. मर्दासारखे काम करतो वगैरे बोलतील. पण त्यांनी एका महिला खासदाराला तुरुंगात टाकून तिला चुकीची वागणूक देऊन नामर्दपणाचे काम केले आहे. याला मर्दपणा म्हणत नाहीत. हनुमान चालीसा पठण करण्याऱ्यांच्या विरोधात राजद्रोहाचं कलम लावले जाते. हे पाहून आज बाळासाहेबांना खूप दु:ख होत असेल. बाळासाहेबांच्या शिवसेनेची उद्धव ठाकरेंनी सुलेमान सेना करुन टाकली आहे अशी घणाघाती टीकाही रवि राणांनी केली.

  राऊत ‘शकुनीमामा’

  यावेळी रवी राणा यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरही टीका केली. बाळासाहेबांच्या शिवसेनेची सुलेमान सेना करुन टाकणाऱ्या उद्धव ठाकरेंना एक शकुनीमामा घेऊन बुडणार आहे. एक वेळ अशी येईल की शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवण्यास कुणी तयार होणार नाही, असे ते म्हणाले.

  दरम्यान, 14 मे रोजी नऊ वाजता दिल्लीत प्राचीन हनुमान मंदिरात हनुमान चालीसा आणि महाआरती करणार असल्याची माहिती रवि राणा यांनी दिली. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी येवो यासाठी प्रार्थना करणार आहे, असे ते म्हणाले.