शिवसेना औरंगजेबसेना झाली; राणा दाम्पत्याचा पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. नवनीत यांनी पुन्हा एकदा हनुमान चालिसा पठणाचे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे(Navneet and Ravi Rana criticize Thackeray government).

  दिल्ली : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. नवनीत यांनी पुन्हा एकदा हनुमान चालिसा पठणाचे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे(Navneet and Ravi Rana criticize Thackeray government).

  आता थेट त्या मुंबईतील वांद्रे येथील बीकेसी मैदानावर जाऊन हनुमान चालिसाचे पठण करणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्या बीकेसी मैदानावर सभा घेतली. त्या मैदानावर आम्ही भव्य सभा घेणार आहोत. या सभेत हनुमान चालिसाचे पठण करून ती जागा पवित्रं केली जाईल, असे राणा म्हणाल्या.

  शनिवारच्या भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची लाचारी स्पष्ट दिसत होती. त्यांनी फक्त टीका केली. शिवसेना आता औरंगजेबसेना झाली का? असा सवालही नवनीत यांनी केला.

  रश्मींना तुरुंगात टाकणार

  जेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सत्ता जाईल आणि तेव्हा रश्मी ठाकरेंना तुरुंगात टाकले तर त्यांना मी कसे वाटते असे विचारणार आहे. कोणताही गुन्हा न करता तुरुंगात टाकल्याचं दुःख काय असते हे त्यांना विचारणार आहे. ती वेळही लवकरच येणार आहे जेव्हा तुमची सत्ता जाईल आणि तुमच्या घरातील महिला तुरुंगात जातील. तेव्हा मी विचारणार तुम्हाला कसे वाटते?
  असं नवनीत राणा म्हणाल्या.

  मुख्यमंत्री लाचार

  दरम्यान, ठाकरेंनी गदेचा अपमान केला, असा आरोपही नवनीत यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी कालच्या सभेत शेतकरी, बेरोजगारी, लोडशेडिंगबद्दल काहीही उल्लेख केला नाही. फक्त दुसऱ्यांवर बोलण्यासाठी ती सभा होती. अडीच वर्षे मुख्यमंत्री कार्यालयात गेले नाहीत. मुख्यमंत्री विदर्भ, मराठवाड्यात गेल्याचे त्यांच्या मुलाने सांगितले. पण त्यांच्या दौऱ्याचा फक्त एकतरी व्हिडीओ त्यांनी जाहीर करावा, असे आव्हानही राणा दाम्पत्याने दिले. देवेंद्र फडणवीसांच्या सरकारनंतर तिप्पट प्रमाणात राज्यात बेरोजगारी वाढली आहे. सत्तेत आल्यानंतर औरंगाबादचे नाव संभाजीनगर करायचे तुम्हीच म्हणाला होता. एक नाव बदलू शकत नाहीत, इतके लाचार मुख्यमंत्री आहेत, अशी टीका राणा दाम्पत्याने केली.