नवनीत राणा आक्रमक ; सावंतांविरोधात तक्रार दाखल करणार

शिवसेना खासदार सावंत यांनी राणा यांचे सर्व आरोप फेटाळून लावले. नवनीत राणा यांनी केलेला आरोप साफ खोटा आहे. त्या मला येता जाता भैया-दादा म्हणून बोलतात. मी ही त्यांच्याशी बोलत असतो. एकतर त्या महिला आहेत आणि मी शिवसैनिक आहे. आम्ही महिलांना धमकावण्याचे काम करत नाहीत. जरी धमकावले असे त्या म्हणत असतील तर त्या ठिकाणी आजुबाजूला कुणी असतील तर ते सांगितल. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांची बोलण्याची पद्धत आहे ती बरोबर नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत बोलताना त्यांची बोलण्याची पद्धत, शैली ही अतिशय घृणास्पद असते, असे अरविंद सावंत यांनी म्हटले आहे.

    दिल्ली : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्यातील वाद आता विकोपाला गेला आहे. खासदार राणा यांनी सावंत यांच्यावर धमकी दिल्याचा गंभीर आरोप सोमवारी केला होता. त्यावर सावंत यांनी खुलासा करत आरोप फेटाळून लावले. मात्र, आता नवनीत राणा आक्रमक झाल्या असून, सावंत यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

    पंतप्रधान मोदी, अमित शाहांना पत्र

    खासदार राणा यांनी मंगळवारी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाही पत्र लिहिले आहे. अरविंद सावंत यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी राणा यांनी पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांकडे केली आहे. दरम्यान, मी सभागृहात हा मुद्दा उचलून धरला. भारतीय संविधान आणि जनतेने मला जो अधिकार दिला आहे, त्याचा वापर करूनच मी बोलले. मात्र, माझ्या बोलण्याने शिवसेना खासदार सावंत यांना मीरच्या झोंबल्या. सावंत म्हणत आहे की, माझी देहबोली चुकीची होती. आता एखादा पुरुष मला सांगेल की, मी कसे बोलावे. आपले विचार कशा पद्धतीने मांडावे, हा माझा प्रश्न आहे. लोकसभेतील माझे भाषण संपल्यानंतर त्यांनी मला धमकी दिली. आता तुझी वेळ आली आहे, तुला तुरुंगात धाडू, असे ते म्हणाले. या धमकीमुळे मी सावंत यांच्याविरोधात तक्रार दाखल करणार आहे, असे राणा यांनी सांगितले.

    सावंतांनी आरोप फेटाळले

    तत्पूर्वी, शिवसेना खासदार सावंत यांनी राणा यांचे सर्व आरोप फेटाळून लावले. नवनीत राणा यांनी केलेला आरोप साफ खोटा आहे. त्या मला येता जाता भैया-दादा म्हणून बोलतात. मी ही त्यांच्याशी बोलत असतो. एकतर त्या महिला आहेत आणि मी शिवसैनिक आहे. आम्ही महिलांना धमकावण्याचे काम करत नाहीत. जरी धमकावले असे त्या म्हणत असतील तर त्या ठिकाणी आजुबाजूला कुणी असतील तर ते सांगितल. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांची बोलण्याची पद्धत आहे ती बरोबर नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत बोलताना त्यांची बोलण्याची पद्धत, शैली ही अतिशय घृणास्पद असते, असे अरविंद सावंत यांनी म्हटले आहे.