नौदलाची विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रमादित्यला आग

युद्धनौका कर्नाटकातील कारवार येथून सागरी कारवाईसाठी निघाली आहे. बुधवारी त्यात आग लागल्याची माहिती समोर आली. पथकाने घटनेनंतर लगेचच जहाजाच्या अग्निशमन यंत्रणेचा वापर करून आग नियंत्रणात आणली.

    नवी दिल्ली : भारतीय नौदलाच्या आयएनएस विक्रमादित्य (INS Vikramaditya) या विमानवाहू जहाजाला (Ship) बुधवारी आग लागली. यानंतर लगेचच उपस्थित असलेल्या टीमने बचावकार्य सुरू केले. त्यामुळे आग काही वेळातच आटोक्यात आली. या घटनेत कोणीही जखमी झाले नसून युद्धनौकाही पूर्णपणे सुरक्षित आहे. या प्रकरणी नौदलाने कोर्ट ऑफ इन्क्वायरीची (Court Of Inquiry) स्थापना केली आहे.

    नौदलाच्या प्रवक्त्याने ट्विट केले की, युद्धनौका कर्नाटकातील कारवार (Karwar) येथून सागरी कारवाईसाठी (Maritime Action) निघाली आहे. बुधवारी त्यात आग लागल्याची माहिती समोर आली. पथकाने घटनेनंतर लगेचच जहाजाच्या अग्निशमन यंत्रणेचा (Fire Brigade) वापर करून आग नियंत्रणात आणली. त्यामुळे उपस्थितांना नौसैनिकाला दुखापत झाली नाही. तसेच, यासाठी चौकशी मंडळ स्थापन करण्यात आले आहे. त्याचा अहवाल आल्यानंतरच अपघाताचे कारण समजू शकेल, असे दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटले आहे.