अण्णा द्रमुकचे पलानीस्वामी म्हणतात, ‘एनडीए लोकसभेच्या 330 जागा जिंकेल’

अण्णा द्रमुक (AIDMK) सरचिटणीस ई. के. पलानीसामी (Palanisami) यांनी बुधवारी दावा केला की, एनडीए देशभरातून 330 लोकसभा जागा (Loksabha Election) जिंकेल. महागाईसारख्या घटकांचा विचार करता एकूण मतांपैकी 50 टक्क्यांहून अधिक मते मिळवणे शक्य आहे का?, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता.

    नवी दिल्ली : अण्णा द्रमुक (AIDMK) सरचिटणीस ई. के. पलानीसामी (Palanisami) यांनी बुधवारी दावा केला की, एनडीए देशभरातून 330 लोकसभा जागा (Loksabha Election) जिंकेल. महागाईसारख्या घटकांचा विचार करता एकूण मतांपैकी 50 टक्क्यांहून अधिक मते मिळवणे शक्य आहे का?, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता.

    यावर अण्णाद्रमुकचे नेते म्हणाले की, देशात कोविड साथीच्या आजारासारखे घटक असूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वमध्ये विकास झाला आहे. याशिवाय, देशातील अनेक अर्थव्यवस्थांना आव्हानांचा सामना करावा लागला. परंतु, भारतात असे झाले नाही कारण एनडीएने चांगल्या पद्धतीने आव्हाने हाताळली.

    एनडीएमधील सर्व घटकांचा आदर

    लोकसभा निवडणुका होईपर्यंत भाजपचे मित्रपक्ष महायुतीत कायम राहणार का?, असे विचारले असता पलानीसामी म्हणाले की, या प्रश्नात काही अर्थ नाही. लहान पक्ष असो किंवा मोठा पक्ष एनडीएमधील सर्व घटकांना योग्य आदर दिला जातो. जो 18 जुलैच्या बैठकीत दिसून आला आणि युतीने एकमताने विचारांच्या आधारावर काम केले. त्यांचा पक्ष तामिळनाडूतील एनडीएची महत्त्वाची ताकद आहे.

    अण्णा द्रमुक हा प्रमुख विरोधी पक्ष असून, त्याचे 1.71 कोटी सदस्य आहेत. पक्षाचे संस्थापक एम. जी. रामचंद्रन यांच्या काळापासून आणि नंतर दिवंगत पक्ष प्रमुख जे. जयललिता यांच्या कार्यकाळात अण्णा द्रमुकने समविचारी पक्षांसोबत युती केली आणि निवडणुका जिंकल्या.