चीनच्या कर्जाच्या जाळ्यातून शेजारील राष्ट्रांना वाचवण्याची गरज, सीडीएस Bipin Rawat यांनी दिला इशारा, काश्मीरमध्ये तालिबान इफेक्ट दिसण्याची व्यक्त केली शक्यता

जनरल रावत (General Rawat) यांनी सांगितले २०२० मध्ये चीनकडून काही समस्या (Problems) आपल्याला सहन कराव्या लागल्या. विवादित मुद्द्यांना आता सैन्य स्तरावर, परराष्ट्र धोरणाच्या (Foreign Policy) स्तरावर आणि राजकीय स्तरावर होणाऱ्या चर्चांतून सोडवण्याचा प्रयत्न सुरु आहे. सीमावादाच्या (Boundaryism) मुद्द्यावर तोडगा नक्की निघेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

  गुवाहाटी : चीनसोबत (China) एलएलसीसह (LLC) इतर वादाचे मुद्दे हे चर्चेतून सोडवण्याचा प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत (Bipin Rawat) यांनी दिली आहे. दोन्ही देशांच्या मनात संशयाची स्थिती अद्यापही कायम असल्याचेही त्यांनी सांगितले. अशा परिस्थितीत वादाच्या मुद्द्यांवर तोडगा काढण्यासाठी वेळ लागणारच, असेही त्यांनी स्पष्ट केले. चीनसोबत असलेल्या सीमावादाच्या प्रश्नाकडे व्यापक रुपात पाहण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. उत्तर पूर्व आणि लडाखच्या मुद्द्यांना वेगवेगळे पाहण्याची गरज नसल्याचे ते म्हणाले. गुवाहाटीत एका कार्यक्रमात ते बोलत होते.

  जनरल रावत (General Rawat) यांनी सांगितले २०२० मध्ये चीनकडून काही समस्या (Problems) आपल्याला सहन कराव्या लागल्या. विवादित मुद्द्यांना आता सैन्य स्तरावर, परराष्ट्र धोरणाच्या (Foreign Policy) स्तरावर आणि राजकीय स्तरावर होणाऱ्या चर्चांतून सोडवण्याचा प्रयत्न सुरु आहे. सीमावादाच्या (Boundaryism) मुद्द्यावर तोडगा नक्की निघेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सीमा वाद पहिल्यांदा झालेला नाही, यापूर्वीही असे वाद झाले आहेत, मात्र हे वाद सोडवण्यासाठी देश आणि सरकार सक्षम असल्याचेही त्यांनी सांगितले.

  चर्चेतून वादावर तोडगा काढण्यासाठी वेळ लागेल

  सुमदोरोंग चूमध्येही असेच झाले होते. हा प्रश्न सोडवण्यासाठी बरात वेळ लागला होता. १९८० च्या तुलनेत यावेळी गतीने हे प्रश्न सोडवण्यात येत आहेत. आपल्या यंत्रणेवर सर्वांचा विश्वास असायला हवा, विशेष करुन आपल्या सैन्यदलांवर भरवसा ठेवायला हवा. असे रावत यांनी सांगितले.

  शेजारील राष्ट्रांना कर्जाच्या जाळ्यातून वाचवण्याची गरज

  हिंद महासागर क्षेत्रात लोकोप्रियता मिळवण्यासाठी, चीन आपल्या आर्थिक शक्तीचा उपयोग करीत आहे. शेजारील राष्ट्रांना कर्जे देऊन त्यांना मिंधे बनवण्याचा चीनचा डाव आहे. चीनच्या कर्जाच्या विळख्यात या देशांनी अडकू नये यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. आपल्या नजिकच्या राष्ट्रांनीही भारताचा कित्येक वर्षांचा मैत्रीपूर्ण व्यवहार लक्षात ठेवण्याची गरज आहे.

  शेजारील राष्ट्रांतील अस्थिरता निपटवून टाकण्याची गरज

  भारता शेजारील देशांमध्ये असलेली अस्थिरता संपुष्टात येण्यासाठी देशाने प्रयत्न करण्याची गरजही रावत यांनी व्यक्त केली आहे. ही आपली या वेळची प्राथमिकता असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. अफगाणिस्थानात काबूलवर तालिबान्यांनी ताबा मिळवल्यानंतर, जम्मू काश्मीर आणि उत्तर पूर्व क्षेत्रातही धोका निर्माण झाला आहे. अशा स्थितीत अंतर्गत देखरेख अधिक मजबूत करुन या धोक्याला सामोरे जाण्याची आणि हा धोका संपवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

  रोहिंग्या शरणार्थींवर कठोर नजर ठेवावी लागेल

  म्यानमार आणि बांग्लादेशसारख्या देशांमध्ये शरणार्थी रोहिंग्यांवर नजर ठेवण्याची गरज आहे. कारण दहशतवादी संघटना रोहिंग्यांचा वापर दहशत पसरवण्यासाठी करु शकतात.