ज्या सुवर्णपदकाकडे भारतीय आशेने पाहत होते, ती आशा नीरज चोप्राने भालापेकमध्ये पूर्ण केली आहे. चमकदार कामगिरी करत नीरजने सुवर्णपदक पटकावले.
ज्या सुवर्णपदकाकडे भारतीय आशेने पाहत होते, ती आशा नीरज चोप्राने भालापेकमध्ये पूर्ण केली आहे. चमकदार कामगिरी करत नीरजने सुवर्णपदक पटकावले.

नीरजने मागील आठवड्यात तुर्कमध्ये 89.30 मीटर पर्यंत भाला फेकत पावो नुरमी स्पर्धेत रजत पदक पटकावलं होतं. नीरजने आपल्या पहिल्याच प्रयत्नात 86.89 मीटरचा थ्रो केला. तर, 15 जून रोजी तुर्कू, फिनलँड येथे झालेल्या पावो नूरमी गेम्समध्ये रौप्य पदक जिंकलं असून त्यादरम्यान त्याने स्वतःचा राष्ट्रीय विक्रमही मोडला आहे.

    ऑलिम्पिकमध्ये सुवर्णकामगिरी करणाऱ्या भारताच्या भालाफेकपटू निरज चोप्राने (Neeraj Chopra) पुन्हा एक विक्रम आपल्या नावे केला आहे. फिनलॅण्डमधील कुओर्ताने स्पर्धेत (Kuortane Games 2022) मध्ये नीरजने ८६.८९ मीटर दूर भालाफेक करत सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरलयं. यापुर्वी निरजने ऑलिम्पिकमध्ये ८७. ५८ मीटर भालाफेक करत सुवर्णपदकावर नाव कोरलं होतं.

    भारताचा स्टार अॅथलीट नीरज चोप्राने पुन्हा एकदा गोल्ड मेडलची कमाई केली आहे. ऑलिम्पिक नंतरच्या आपल्या पहिल्या स्पर्धेत त्याने नॅशनल रेकॉर्ड स्थापित केलं आहे. त्यानंतर दुसऱ्या स्पर्धेत त्याने पुन्हा गोल्ड मेडल प्राप्त केलं आहे. फिनलँडमध्ये सुरु असलेल्या कुओर्ताने स्पर्धेत (Kuortane Games 2022) गोल्ड मेडलवर नाव कोरत त्याने पुन्हा एकदा सोन्याची लूट केली आहे. स्पर्धे दरम्यान, भालाफेक करताना त्याचा पाय घसरला. तो खाली पडला. पण त्याने जिद्द सोडली नाही. त्याने त्याचं सोनेरी स्वप्न साकार केलंच.

    नीरजने मागील आठवड्यात तुर्कमध्ये 89.30 मीटर पर्यंत भाला फेकत पावो नुरमी स्पर्धेत रजत पदक पटकावलं होतं. नीरजने आपल्या पहिल्याच प्रयत्नात 86.89 मीटरचा थ्रो केला. तर, 15 जून रोजी तुर्कू, फिनलँड येथे झालेल्या पावो नूरमी गेम्समध्ये रौप्य पदक जिंकलं असून त्यादरम्यान त्याने स्वतःचा राष्ट्रीय विक्रमही मोडला आहे. नीरजने येथे 89.30 मीटर अंतरावर भाला फेकला. याआधी नीरज चोप्राच्या नावावर असलेला राष्ट्रीय विक्रम मार्च 2021 मध्ये झाला होता. जेव्हा त्याने 88.07 मीटर अंतरावर भाला फेकला होता. याशिवाय टोकियो ऑलिम्पिक-2020 मध्ये नीरज चोप्राने 87.58 मीटर अंतरावर भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. 24 वर्षीय नीरजला 7 ऑगस्ट 2021 रोजी सुवर्णपदक मिळाले, त्यानंतर तो प्रथमच एका स्पर्धेत भाग घेत होता आणि त्याने थेट राष्ट्रीय विक्रम केला.