नीट पीजी परीक्षेचा निकाल जाहीर, ‘या’ वेबसाईटवर मिळेल माहिती

नीट पीजी- २०२१ परीक्षेचा (NEET PG Result 2021) निकाल जाहीर झाला आहे.११ सप्टेंबर २०२१ रोजी झालेल्या नीट पीजी परीक्षेला बसलेले उमेदवार आता nbe.edu.in किंवा natboard.edu.in या वेबसाईटवर जाऊन हे निकाल पाहू शकतात.

    नीट पीजी- २०२१ परीक्षेचा (NEET PG Result 2021) निकाल जाहीर झाला आहे. नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेस (NBEMS) ने नेशनल एलिजिबिलिटी एन्ट्रन्स टेस्ट अर्थात नीट (NEET) पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा निकाल जाहीर केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ११ सप्टेंबर २०२१ रोजी झालेल्या नीट पीजी परीक्षेला बसलेले उमेदवार आता nbe.edu.in किंवा natboard.edu.in या वेबसाईटवर जाऊन हे निकाल पाहू शकतात.

    नीट पीजी २०२१ निकाल गुणवत्ता यादीच्या स्वरूपात जाहीर करण्यात आला आहे. त्यात हजेरी क्रमांक, गुण (८०० पैकी) आणि उमेदवारांनी मिळवलेले रँक यांसारखे तपशील असतील. निकाल जाहीर झाल्यानंतर उमेदवारांना समुपदेशन प्रक्रियेतून जावं लागेल. नीट पीजी समुपदेशन प्रक्रियेचा तपशील लवकरच अधिकृत वेबसाइटवर जारी केला जाईल.

    निकालासह नीट पीजी क्वालिफायिंग कट ऑफ पर्सेंटाइल देखील जाहीर करण्यात आलं आहे. यावर्षी सामान्य श्रेणीसाठी कट ऑफ स्कोअर ८०० पैकी ३०२, एससी/एसटी /ओबीसींसाठी ८०० पैकी २६५ आणि UR-PWD साठी २८३ आहे. अधिकृत सूचनेनुसार, अखिल भारतीय ५० टक्के कोटा जागांसाठी रँक आणि पात्रता स्थिती स्वतंत्रपणे जाहीर केली जाईल. कोरोना प्रतिबंधक सर्व नियमांचं पालन करून ही परीक्षा घेण्यात आली आहे.