neet

NTA ने संसदीय समितीला आश्वासन दिलं आहे की NEET UG 2023 का रिझल्ट जूनच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होईल.

  दिल्ली:नॅशनल टेस्टिंग एजन्सी(NTA) लवकरच नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्टचा रिझल्ट जाहीर करु शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा निकाल जूनच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होऊ शकतो. रिझल्ट जाहीर झाल्यानंतर परिक्षा देणारे विद्यार्थी नीटची वेबसाईट neet.nta.nic.in तो पाहू शकतात.

  जूनच्या दुसऱ्या आठवड्यात लागणार निकाल
  याशिवाय उमेदवार https://neet.nta.nic.in/ या लिंकद्वारेही NEET UG Result 2023 चेक करू शकतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार असंही सांगितलं जात आहे की, NTA ने संसदीय समितीला आश्वासन दिलं आहे की, NEET UG 2023 का रिझल्ट जूनच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होईल. हे आश्वासन NTA ने नुकतंच समितीला दिलं आहे.

  मणिपूरचे विद्यार्थी आज देतायत परीक्षा
  आज, मणिपुरवरून 8,700 उमेदवार NEET UG परीक्षेत सहभागी झाले आहेत. हे ते उमेदवार आहेत जे राज्यात होत असलेल्या हिंसेमुळे 7 मे रोजी इम्फाळमध्ये परीक्षा देऊ शकले नाही. एनटीएने (NTA) त्यांना 10 शहरांमध्ये परीक्षा देण्याची संधी दिली आहे.  देशातील इतर सगळ्या भागातील उमेदवारांसाठी मेडिकल प्रवेश परीक्षा 7 मे रोजी आयोजित करण्यात आली होती. ज्यात 97.7 टक्के विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली.

  प्रोव्हिजनल आन्सर कीच्या विरोधात कधीपर्यंत घेऊ शकता हरकत?
  दरम्यान, NTA ने देशातील सगळ्या राज्यांमधील परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी NEET UG OMR Response Sheet आणि प्रोव्हिजनल NEET UG Answer Key 2023 जाही केली आहे. तसेच प्रोव्हिजनल आन्सर कीच्या विरोधात हरकत नोंदवण्यासाठी उमेदवारांना 6 जूनला रात्री 11:50 वाजेपर्यंतचा वेळ देण्यात आला आहे.