‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून कधीही मदत घेतली नाही’ मोंदीचे मित्र अब्बास अली यांच्याकडून आठवणी शेयर

अब्बास यांनी म्हटलं की, त्यांचे वडील आणि मोदींच्या वडिलांची मैत्री होती. 4 किलोमीटर अंतरावर त्यांचं गाव होतं. वडिलांच्या मृत्यूनंतर एक वर्ष ते पंतप्रधान मोदी यांच्या वडिलांच्या घरी राहिले. मोदींच्या वडिलांनीच अब्बास यांना आपल्या घरी आणलं होतं. तिथूनच ते मॅट्रिक पास झाले.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आई हिराबेन मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त खास ब्लॅाग लिहीला होता. या ब्लॅागमध्ये त्यांनी आईसोबतच्या आणि काही त्यांच्या बालपणीच्या आठवणी शेयर करत केल्या. वडिलांच्या जवळच्या मित्राच्या मृत्यूनंतर त्यांनी त्याच्या मुलाला आमच्या घरी आणले होते आमच्यासोबत राहून त्याने शिक्षण पूर्ण केले असं म्हटलं होतं. यावर त्यांचे मित्र अब्बास अली यांनीही प्रतिक्रीया देत त्यांच्या मोदींसोबतच्या आठवणी शेयर केल्या आहेत.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आई हिराबेन मोदी यांच्या शंभराव्या वाढदिवसानिमित्त त्यांनी एक खास ब्लॉग लिहिला होता. आईचा वाढदिवस खास बनवण्यासाठी पंतप्रधानांनी ब्लॉगच्या माध्यमातून काही आठवणी शेअर केल्या होत्या. त्यात पंतप्रधान मोदी यांचे बालपणीचे मुस्लिम मित्र अब्बास याच्याबद्दलच्या आठवणींनाही उजाळा दिला होता. वडिलांचा एक जवळचा मित्र बाजूच्या गावात राहायचा. त्यांच्या अकाली मृत्यूनंतर, वडिलांनी त्यांच्या मित्राच्या मुलाला, अब्बासला आमच्या घरी आणले. आमच्यासोबत राहून त्याने शिक्षण पूर्ण केले असं पंतप्रधानांनी ब्लॉगच्या माध्यमातून म्हटलं होतं.

    अब्बास यांनी म्हटलं की, त्यांचे वडील आणि मोदींच्या वडिलांची मैत्री होती. 4 किलोमीटर अंतरावर त्यांचं गाव होतं. वडिलांच्या मृत्यूनंतर एक वर्ष ते पंतप्रधान मोदी यांच्या वडिलांच्या घरी राहिले. मोदींच्या वडिलांनीच अब्बास यांना आपल्या घरी आणलं होतं. तिथूनच ते मॅट्रिक पास झाले. अब्बास म्हणाले की, आम्ही त्यावेळी होळी, दिवाळी, ईद एकत्र साजरी करायचो. मोदी यांच्या मातोश्री ईदवेळी सेवई बनवायच्या. आज जसं वातावरण आहे तसं आधी नव्हतं. होळी, दिवाळी एकत्र सेलिब्रेट करायचो.अब्बास यांनी म्हटलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून कधीही मदत घेतली नाही. अहमदाबाद मध्ये राहत असून कधी भेटलो नाहीत. मोदी यांच्याशी कमीत कमी भेट झाली, असं ते म्हणाले.