
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात देशभरात 1,300 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या आज 7,605 इतकी झाली आहे. उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण आतापर्यंतच्या एकूण रुग्ण संख्येच्या 0.02% इतके आहे. सध्या रुग्ण बरे होण्याचा दर 98.79% इतका आहे.
नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची(Corona) संख्या वाढू लागली आहे. गेल्या 24 तासांत देशात 1300 नव्या कोरोना रुग्णांची नोंद (Corona Patients In India) झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार 140 दिवसानंतर झालेली ही सर्वाधिक वाढ आहे. वातावरण बदलामुळे सर्दी ताप आणि खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे, त्यामुळे कोरोनाचा वेगाने पसरत आहे. त्यातच एच3एन2 च्या विषाणूने थैमान घातल्याने लोकांना जास्त त्रास होत आहे.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात देशभरात 1,300 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या आज 7,605 इतकी झाली आहे. उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण आतापर्यंतच्या एकूण रुग्ण संख्येच्या 0.02% इतके आहे. सध्या रुग्ण बरे होण्याचा दर 98.79% इतका आहे.
#COVID19 UPDATE
🔹220.65 cr Total Vaccine doses have been administered so far
🔹7,530 doses administered in the last 24 hours
🔹India’s Active caseload currently stands at 7,605
🔹Active cases stand at 0.02%
Details: https://t.co/v1r8OH9ET7 pic.twitter.com/hQTo5b1jll
— PIB India (@PIB_India) March 23, 2023
गेल्या 24 तासात 718 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत देशातील कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 4,41,60,997 इतकी झाली आहे. देशातील दैनंदिन कोरोना पॉझिटिव्हिटी दर 1.46 टक्के आहे. सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 1.08% इतका आहे. गेल्या 24 तासांमध्ये देशभरात महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरात या राज्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
देशभरात आत्तापर्यंत (महामारी सुरु झाल्यापासून) 92.06 कोटी कोविड चाचण्या झाल्या आहेत. गेल्या 24 तासात 89,078 कोविड चाचण्या झाल्या. कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये आतापर्यंत लसीच्या 220 कोटी 65 लाखांहून अधिक मात्रा (95.20 कोटी दुसरी मात्रा आणि 22.86 कोटी वर्धक मात्रा) देण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासात 7,530 लस मात्रा देण्यात आल्या आहेत.
राज्यात बुधवारी कोरोनाच्या 334 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या आता 1 हजार 648 वर गेली आहे. तर आज एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. त्यापाठोपाठ मुंबई, ठाण्यात अधिक रुग्ण आहे. पुण्यात 496, मुंबईत 361 आणि ठाण्यात 314 रुग्ण आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (22 मार्च) सायंकाळी कोरोनाची आढावा बैठक घेतली. यावेळी कोरोना आणि एचएन 2 इन्फ्लूएंझा व्हायरसच्या वाढत्या प्रकरणांवर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.