Covid-19 can cause loneliness and special challenges in visually impaired seniors

डेन्मार्कच्या स्टेटेन्स इन्स्टिट्युटच्या संशोधकांनी(research about corona) देशाच्या राष्ट्रीय कोविड-१९ तपास योजनेअंतर्गत काही आकडे एकत्रित केले आहे. यात २०२० मध्ये दोन तृतीयांश लोकसंख्येची चाचणी करण्यात आली आहे. संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार, ६५ वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील वृद्धांना(corona to senior citizen) कोविड होण्याची शक्यता अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे.

    दिल्ली: कोरोना व्हायरसने(corona) संक्रमित बहुतांश रुग्णांना पुन्हा संक्रमित होण्याचा अधिक धोका असल्याचा दावा एका संशोधनात करण्यात आला आहे. डेन्मार्कच्या स्टेटेन्स इन्स्टिट्युटच्या संशोधकांनी(research about corona) देशाच्या राष्ट्रीय कोविड-१९ तपास योजनेअंतर्गत काही आकडे एकत्रित केले आहे. यात २०२० मध्ये दोन तृतीयांश लोकसंख्येची चाचणी करण्यात आली आहे.

    संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार, ६५ वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील वृद्धांना कोविड होण्याची शक्यता अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. अभ्यासांतर्गत संशोधकांनी वय व लैंगिक आधारावर तसेच संक्रमणाच्या वेळेतील अंतरावर लक्ष देत पॉझिटिव्ह व निगेटिव्ह चाचणीच्या परिणामांच्या सरासरीचे आकलन केले आहे. संशोधकांचे म्हणणे आहे की, अभ्यासाचे परिणाम महामारीच्या दरम्यान वृद्धांच्या सुरक्षात्मक उपाय करण्याला महत्त्व असल्याचे सांगितले आहे.

    लोक कोरोनाच्या कचाट्यात पुन्हा येण्याच्या अभ्यासात आढळले की, लोक मार्च व मे २०२० दरम्यान पहिल्या लाटेचे शिकार झाले होते. संशोधकांनी सांगितले की, सप्टेंबर ते डिसेंबर २०२० पर्यंत दुसऱ्या लाटेत फक्त ०.६५ टक्के लोकांना पुन्हा कोरोना झाला. जे लोक पूर्वी कोरोना संक्रमित झाले नव्हते, ते दुसऱ्या लाटेत संक्रमित झाल्यानंतर त्यांच्यातील संक्रमणाचा दर पाच पट अधिक होता. अभ्यासात सांगण्यात आले की, ६५ वर्षांपेक्षा कमी वयाचे लोक जे पहिल्या लाटेदरम्यान संक्रमित होत होते, त्यांच्यातील ०.६० टक्के लोक दुसऱ्या लाटेत संक्रमित झाले.

    संशोधकांनी सांगितले की, ज्येष्ठांना पुन्हा संक्रमण होण्याचा धोका अधिक आहे. ६५ वर्षे व त्यापेक्षा अधिक वयाच्या ०.८८ टक्के लोक जे पहिल्या लाटेत संक्रमित झाले होते, ते दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोना पॉझिटिव्ह आढळले.