केंद्र सरकार आणणार ६० हजार कोटी रुपयांची अनुदान योजना, २५ लाख लोकांना होणार लाभ

प्रधानमंत्री योजनेचा १.१८ कोटी लोकांना लाभ झाला आहे. दारिद्र रेषेखाली बेघर, कच्च्या घरामध्ये तसे झोपडीमध्ये राहणाऱ्या कुटूंबांना पक्की घरे देण्याची पीएम आवास याेजना २२ जून २०१५ रोजी सुरू झाली हाेती.

    केंद्र सरकारच्या नव्या योजना : शहरामध्ये झोपडपट्टी तसेच भाड्याने राहणाऱ्या हक्काच्या घराचे स्वप्न साकारण्यासाठी लवकरच केंद्र सरकार ६० हजार कोटी रुपयांची अनुदान योजना आणणार आहे. या नव्या योजनेचा शहरी भागांमध्ये सुमारे २५ लाख लोकांचा लाभ होणार आहे. याच संदर्भात बँकांची सरकारी अधिकाऱ्यांसमवेत बैठक हाेणार आहे. या बैठकीआधी लाभार्थींची ओळख प्रक्रिया सुरु केली आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणूक लक्षात घेऊन काही महिन्यांमध्ये ही योजना सुरु होऊ शकते. त्याअंतर्गत ९ लाख रुपयांपर्यतचे कर्ज वार्षिक ३ ते ६.५ टक्के व्याजदर अनुदानावर मिळणार आहे.

    २० वर्षे मुदतीसाठी ५० लाखांपर्यतचे कर्ज घेणारे या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. ही योजना सध्याच्या प्रधानमंत्री आवास योजनेपेक्षा वेगळी असेल. अलीकडेच केंद्रीय गृह तसेच नगरविकासमंत्री हरदीपसिंह पुरी म्हणाले, शहरांत घर खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी गृहकर्ज अनुदान याेजनेस सप्टेंबरमध्ये अंतिम स्वरूप दिले जाईल. प्रधानमंत्री योजनेचा १.१८ कोटी लोकांना लाभ झाला आहे. दारिद्र रेषेखाली बेघर, कच्च्या घरामध्ये तसे झोपडीमध्ये राहणाऱ्या कुटूंबांना पक्की घरे देण्याची पीएम आवास याेजना २२ जून २०१५ रोजी सुरू झाली हाेती.

    आगामी याेजना २०२८ पर्यंतसाठी असेल. या याेजनेत सरकारकडून दिले जाणारे अनुदान थेट लाभार्थीच्या खात्यात जाईल. याेजनेला लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळासमाेर मंजुरीसाठी मांडले जाईल. नव्या याेजनेमुळे अनेक प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मदत हाेईल. यातून अनेक क्षेत्रांत राेजगार मिळेल, असे आर्थिक तज्ज्ञांना वाटते. घर खरेदीदार व रिअल इस्टेट क्षेत्राला प्राेत्साहन मिळेल. अर्थव्यवस्थेत गती मिळेल. अलीकडे कर्ज महागले आहे. आरबीआयने गेल्या वर्षी मेमध्ये रेपाे रेट २.५ टक्क्यांपर्यंत वाढवला आहे.