दूध घशात अडकल्याने 28 दिवसांचं अर्भक दगावले; मोठा धक्का बसलेल्या मातेनेही संपवलं जीवन

नवजात अर्भक (Newborn Baby Died) जेव्हा दूध पित होते तेव्हा त्याच्या घशात दूध अडकले. यामध्येच हे अर्भक दगावल्याची दुर्दैवी घटना केरळमधील इडुक्की (Edukki) जिल्ह्यात घडली. आपलं बाळ दगावल्याचा धक्का बसल्याने त्याच्या आईने दुसऱ्या मुलासह आत्महत्या (Woman Committed Suicide) करून आपलं जीवन संपवलं.

तिरुअनंतपुरम : नवजात अर्भक (Newborn Baby Died) जेव्हा दूध पित होते तेव्हा त्याच्या घशात दूध अडकले. यामध्येच हे अर्भक दगावल्याची दुर्दैवी घटना केरळमधील इडुक्की (Edukki) जिल्ह्यात घडली. आपलं बाळ दगावल्याचा धक्का बसल्याने त्याच्या आईने दुसऱ्या मुलासह आत्महत्या (Woman Committed Suicide) करून आपलं जीवन संपवलं. या घटनेने खळबळ उडाली आहे. घराच्या आवारात असलेल्या विहिरीतून दोघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले. ही घटना दोन दिवसांपूर्वी घडल्याचे सांगितले जात आहे.

केरळमधील इडुक्की जिल्ह्याजवळील उप्पुथरा येथे गुरुवारी सकाळी विहिरीत 38 वर्षीय महिला आणि तिच्या 7 वर्षांच्या मुलाचे मृतदेह आढळून आले. लिसा आणि बेन टॉम अशी यामध्ये मृत पावलेल्यांची नावे आहेत. दोघेही कैथपथल येथील रहिवासी आहेत. सकाळी सहाच्या सुमारास महिलेने मुलासह विहिरीत उडी घेतल्याची माहिती दिली जात आहे.

28 दिवसांचं होतं बाळ

28 दिवसांच्या बाळाला दूध पाजत असताना ते दगावल्याने संबंधित महिलेला अत्यंत दु:ख झाले. तिला यामुळे मोठा धक्काही बसला. या धक्कानंतर तिने स्वत:सह तिच्या दुसऱ्या लहान मुलाला घेऊन विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. या प्रकारानंतर एकच खळबळ उडाली आहे.