मोठी बातमी! न्यूजक्लिकचे संस्थापक प्रबीर पुरकायस्थ एचआर प्रमुखाला ७ दिवसांची पोलीस कोठडी

पोलिसांनी 3 ऑक्टोबरला दिल्लीत जवळपास 30 हून अधिक ठिकाणी छापे मारले. अनेक पत्रकारांची चौकशी केली आणि पुरकायस्थ आणि चक्रवर्ती यांना अटक केली.

    मंगळवारी दिल्ली पोलिसांनी न्यूजक्लिकचे वृत्तसंस्थेच्या कार्यालयासह विविध ठिकाणी छापे (Raid on NewsClick) मारले. यावेळी अनेक पत्रकारांची चौकशी करण्यात आली. तर, न्यूजक्लिकचे संस्थापक प्रबीर पुरकायस्थ (NewsClick founder Prabir Purkayastha)आणि एचआर प्रमुख अमित चक्रवर्ती  (HR head Amit Chakravarti) यांच्यावर दहशतवादविरोधी कायदा UAPA अंतर्गत गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली. या प्रकरणी आता मोठी अपडेट समोर येत आहे. आज प्रबीर पुरकायस्थ  आणि अमित चक्रवर्ती यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

    मंगळवारी दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई करत पोलिसांच्या विशेष पथकाने यामध्ये न्यूजक्लिक (Newsclick) वृत्तसंस्थेवर धाड टाकली. या वृत्तसंस्थेशी निगडीत अनेक पत्रकारांच्या घरांवर छापे टाकले टाकला. यावेळी मोबाईल आणि लॅपटॉप जप्त करण्यात आले.  या पोर्टलला चीन समर्थक प्रचारासाठी पैसे मिळाल्याच्या आरोपानंतर त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी मंगळवारी 30 हून अधिक ठिकाणी छापा मारला. या प्रकरणाच्या संदर्भात अनेक पत्रकारांची चौकशी केली आणि पुरकायस्थ आणि चक्रवर्ती यांना अटक केली. तसेच, पोलिसांनी मंगळवारी न्यूजक्लिकचे दिल्लीतील कार्यालय सील केले. अधिका-यांनी यापूर्वी सांगितले की 46 ‘संशयितांची’ चौकशी करण्यात आली आणि लॅपटॉप आणि मोबाईल फोनसह डिजिटल उपकरणे आणि कागदपत्रे तपासणीसाठी नेण्यात आली.

    या दरम्यान पत्रकार उर्मिलेश, अनिंद्यो चक्रवर्ती, अभिसार शर्मा, परंजॉय गुहा ठाकुर्ता तसेच इतिहासकार सोहेल हाश्मी, विडंबनकार संजय राजौरा आणि सेंटर फॉर टेक्नॉलॉजी अँड डेव्हलपमेंटचे डी रघुनंदन यांचीगी चौकशी करण्यात आली. त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. सहा तासांहून अधिक काळ चौकशी केल्यानंतर त्यांना सोडण्यात आले.

    कशासाठी गुन्हा दाखल केला?

    मिळालेल्या माहितीनुसार,  य वर्षी १७ ऑगस्ट रोजी न्यूजक्लिकवर दहशतवाद विरोधी कायदा UAPA आणि IPC च्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला होता. ही पोलिस कारवाई 17 ऑगस्ट रोजी दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे अंमलबजावणी संचालनालयाच्या इनपुटवर आधारित आहे. याप्रकरणी मंगळवारी छापा टाकण्यात आला. न्यूजक्लिकला चीनकडून युनायटेड स्टेट्समधून बेकायदेशीरपणे निधी प्राप्त झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. ED ने फेब्रुवारी 2021 मध्ये 2018 आणि 2021 दरम्यान कथितपणे प्राप्त झालेल्या परदेशी रेमिटन्सच्या चौकशीचा भाग म्हणून NewsClick च्या परिसराची झडती घेतली होती.

    कोणत्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला?

    पोलिसांनी UAPA च्या कलम 16, 17, 18 आणि 22C अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय, आयपीसी कलम 153A (दोन समुदायांमधील वैर वाढवणे) आणि 120B (गुन्हेगारी कट) देखील एफआयआरमध्ये लावण्यात आले आहेत.