Union Minister Nitin Gadkari inaugurates three-day National Conference

पुढील दोन वर्षात देशातील रस्ते (Country road) अमेरिकेसारखे होतील, असं नितीन गडकरींनी (Niteen Gadkari) राज्यसभेतील (Rajysabha) प्रश्नोत्तराच्या तासात एका प्रश्नाला उत्तर देताना म्हटले. पुढे बोलताना गडकरी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाने पैशाची कोणतीही कमतरता नाही. यामुळं आगामी काळात म्हणजे पुढील दोन वर्षात वर्षात देशातील रस्ते अमेरिकेसारखे होतील, असं नितीन गडकरींनी म्हटलं आहे.

    नवी दिल्ली : देशाला स्वातंत्र्य होऊन पंच्चात्तर वर्ष (Independence 75 years) पूर्ण होत आहेत, एकीकडे आपण “आझादी का अमृत महोत्सव” (Azadi ka Amrut mahostav) साजरा करत आहोत. तर दुसरीकडे देशातील पायाभूत सुविधांच्या अजूनही खूप गंभीर समस्या आहेत. दरम्यान, देशातील बऱ्याच ठिकाणी रस्त्यात खड्डे की खड्ड्यात (Raods) रस्ते हेच समजत नाहीय, आपण मागील पंधरा वीस वर्षात देशातील रस्ते चांगले होताना दिसत आहेत. दरम्यान, आता पुढील दोन वर्षात देशातील रस्ते (Country road) अमेरिकेसारखे होतील, असं नितीन गडकरींनी (Niteen Gadkari) राज्यसभेतील (Rajysabha) प्रश्नोत्तराच्या तासात एका प्रश्नाला उत्तर देताना म्हटले. पुढे बोलताना गडकरी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाने पैशाची कोणतीही कमतरता नाही. यामुळं आगामी काळात म्हणजे पुढील दोन वर्षात वर्षात देशातील रस्ते अमेरिकेसारखे होतील, असं नितीन गडकरींनी म्हटलं आहे.

    दरम्यान, येत्या तीन वर्षात देशात सव्वीस हरित द्रुतगती मार्ग तयार करण्याचा विचार करत आहे. केंद्रीय मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या तयारीनंतर दिल्ली ते डेहराडून, हरिद्वार किंवा जयपूरचा प्रवास अवघ्या दोन तासांत करता येईल. तर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) कडे पैशांची कमतरता नाही, ते आर्थिकदृष्ट्या खूप मजबूत आहे. त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली भारताचे रस्ते आणि पायाभूत सुविधा अमेरिकेत आहेत तसा असतील. असा विश्वास केंद्रीयमंत्री नितीन गडकरींनी व्यक्त केला.