कॅनडा भारत वादानंतर NIA ने तयार केली जगभरातील खलिस्तान्यांची यादी, कॅनडा, ब्रिटन, अमेरिका आणि दुबईवर नजर!

परदेशात बसून भारताविरुद्ध कट रचणाऱ्या या दहशतवाद्यांच्या देशातील सर्व मालमत्ता आता जप्त करण्यात येणार आहेत. एनआयएने जारी केलेल्या यादीत १९ दहशतवाद्यांची नावे आहेत.

    कॅनडात खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येनंतर (Khalistani terrorist Hardeep Singh Nijjar) भारत आणि कॅनडाच्या (India-Canada) संबंधात कटुता शिगेला पोहोचली आहे. दरम्यान, पंजाबमधील दहशतवादावर कारवाई करण्यासाठी राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) खलिस्तानी दहशतवाद्यांची नवी यादी तयार केली आहे. आता सरकार त्यांचे आर्थिक स्रोत बंद करण्याचे काम करत आहे.
    SFJ प्रमुख आणि खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू यांची मालमत्ता जप्त केल्यानंतर NIA ने खलिस्तानी दहशतवाद्यांची नवीन यादी जारी केली आहे. परदेशात बसून भारताविरुद्ध कट रचणाऱ्या या दहशतवाद्यांच्या देशातील सर्व मालमत्ता आता जप्त करण्यात येणार आहेत. एनआयएने जारी केलेल्या यादीत १९ दहशतवाद्यांची नावे आहेत.
    या यादीत परदेशात बसून भारताविरुद्ध कट रचणाऱ्या अनेकांचा समावेश आहे. SFJ प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नू यांची संपत्ती जप्त केल्यानंतर फरारी खलिस्तानी दहशतवाद्यांची ही नवी यादी तयार करण्यात आली आहे.
    एनआयएच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रिटन, अमेरिका, कॅनडा, दुबई, पाकिस्तान आणि इतर देशांमध्ये राहणाऱ्या फरारी खलिस्तानींच्या भारतातील सर्व मालमत्ता जप्त करण्यात येणार आहेत. या मालमत्ता UAPA च्या कलम 33(5) अंतर्गत जप्त केल्या जातील.
    एनआयएच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही यादी अशा 19 खलिस्तानी दहशतवाद्यांची तयार करण्यात आली आहे जे परदेशात राहून भारताविरोधात भारतविरोधी प्रचार करत आहेत. या खलिस्तानी दहशतवाद्यांची नावे या यादीत समाविष्ट आहेत.
    1.परमजीत सिंग पम्मा- UK
    2.वाधवा सिंग (बब्बर चाचा) – पाकिस्तान
    3.कुलवंत सिंग मुथरा-यूके
    4.जय धालीवाल -यूएसए
    5.सुखपाल सिंग-यूके
    6-हरप्रीत सिंग (राणा सिंग) – यू.एस
    7.सरबजीत सिंग बेन्नूर- UK
    8.कुलवंत सिंग (कांता) – UK
    9. हरजाप सिंग (जप्पी सिंग) यू.एस
    10.रणजित सिंग नीता- पाकिस्तान
    11.गुरमीत सिंग (बग्गा बाबा)
    12.गुरप्रीत सिंग (बंडखोर) – यूके
    13.जस्मीत सिंग हकीमजादा- दुबई (ड्रग स्मगलर)
    14.गुरजंत सिंग ढिल्लन- ऑस्ट्रेलिया
    15- लखबीर सिंग रोडे- कॅनडा
    16.अमरदीप सिंग पुरेवाल- यू.एस
    17.जतिंदर सिंग ग्रेवाल- कॅनडा
    18- दुपिंदर जीत – ब्रिटन
    19- एस. हिम्मत सिंग- यू.एस