९०१ पोलिसांना राष्ट्रपती पदके जाहीर; महाराष्ट्रातील ७४ पोलिसांचा समावेश, सविस्तर यादी माहितेय का? वाचा…

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशभरातील ९०१ पोलिसांना बुधवारी राष्ट्रपती पदके जाहीर करण्यात आली. पोलिस दलात केलेले शौर्य, उल्लेखनीय आणि गुणवत्तापूर्वक कामगिरीबद्दल महाराष्ट्रातील ७४ पोलिसांना गौरविण्यात येणार आहे.

    नवी दिल्ली– ७४ व्या प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कार (Padma Awards 2023) जाहीर करण्यात आल्यानंतर आता प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने देशातील उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या पोलिसांना (Police Award) राष्ट्रपती पदके जाहीर करण्यात आली आहे. देशभरातील ९०१ पोलिसांना राष्ट्रपती पदके देण्यात येणार असून यामध्ये महाराष्ट्रातील ७४ पोलिसांचा समावेश आहे. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्यांना पद्मभूषण, पद्मश्री आणि पद्मभूषण Padma Bhushan, Padma Shri and Padma Bhushan) अशा तीन पुरस्कारांची प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला घोषणा करण्यात आली आहे. केंद्र सरकारने एकूण १०६ जणांची पद्म पुरस्कारांसाठी निवड केली आहे.

    दरम्यान, प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशभरातील ९०१ पोलिसांना बुधवारी राष्ट्रपती पदके जाहीर करण्यात आली. पोलिस दलात केलेले शौर्य, उल्लेखनीय आणि गुणवत्तापूर्वक कामगिरीबद्दल महाराष्ट्रातील ७४ पोलिसांना गौरविण्यात येणार आहे. राज्यातील पदक विजेत्यांमध्ये मुंबईचे विशेष पोलिस आयुक्त देवेन भारती, अतिरिक्त महासंचालक अनुपकुमार सिंह, गुन्हे शाखेचे सहआयुक्त लखमी गौतम, सहआयुक्त (अभियान) जयकुमार, आर्थिक गुन्हे शाखेचे सहआयुक्त निशित मिश्रा यांचा समावेश आहे. देशातील ९३ पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांना उल्लेखनीय सेवेकरिता राष्ट्रपती पदके जाहीर झाली असून यामध्ये यात महाराष्ट्रातील चार पोलिसांचा समावेश आहे. विशेष पोलिस आयुक्त देवेन भारती, अतिरिक्त पोलिस महासंचालक अनुपकुमार सिंह, उपनिरीक्षक संभाजी देशमुख, दीपक जाधव अशी या अधिकाऱ्यांची नावे आहेत.

    पोलिस दलामध्ये गुणवत्तापूर्वक सेवा बजावल्याप्रकरणी राज्यातील ३९ पोलिसांना राष्ट्रपती पोलिस पदके जाहीर करण्यात आली आहेत. मुंबई गुन्हे शाखेचे सहआयुक्त लखमी गौतम, सहआयुक्त जय कुमार, आर्थिक गुन्हे शाखेचे सहआयुक्त निशित मिश्रा, अधीक्षक संतोष गायके, सहायक आयुक्त चंद्रकांत मकर, निरीक्षक दीपक चव्हाण, रमेश कठार, देविदास घेवरे, सुधाकर काटे, शैलेश पासलवाड, मनोज नेर्लेकर, शाम शिंदे, अलका देशमुख, दत्तात्रय पाबळे आदींचा समावेश आहे, तर महाराष्ट्रातील ३१ पोलिसांना विविध विभागांत बजावलेल्या शौर्याबद्दल पदके देण्यात येणार आहेत.