
निर्मला यांची मुलगी परकला वांगमयी ही पत्रकार आहे. तर निर्मला सीतारमण यांच्या जावयाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत खास कनेक्शन आहे.
बंगळुरू: देशाच्या अर्थमंत्र्यांच्या लेकीच्या लग्नाची जेव्हा आपण कल्पना करतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर वारेमाप खर्च करून पार पडलेले शाही लग्न येतं. मात्र अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांच्या मुलीच्या लग्नात मात्र असा कोणताही प्रकार दिसला नाही. अतिशय साध्या पद्धतीने परकला आणि प्रतीक (Pratik Doshi) यांचं लग्न बंगळुरूमध्ये पार पडलं. निर्मला यांची मुलगी परकला वांगमयी ही पत्रकार आहे. तर निर्मला सीतारमण यांच्या जावयाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत खास कनेक्शन आहे. त्याबद्दल आपण जाणून घेऊयात. (Parakala Vangmayi Wedding)
Union Finance Minister Nirmala Sitharaman’s daughter got married in Bangalore yesterday.
This news never appeared in any Tamil or English media. pic.twitter.com/muca1iYENk
— Cdr_Kunal🇮🇳 (@CdrKunal) June 8, 2023
पंतप्रधानांच्या कार्यालयात ते स्पेशल ड्युटी ऑफिसर
प्रतीक दोशी हे मुळचे गुजरातचे आहेत. पंतप्रधानांच्या कार्यालयात ते स्पेशल ड्युटी ऑफिसर म्हणून काम करत आहेत. ज्यावेळी नरेंद्र मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हापासून प्रतीक दिल्लीत आहेत. त्यानंतर 2019 मध्ये त्यांचं संयुक्त सचिव म्हणून प्रमोशन करण्यात आलं.
सीएमओ ते पीएमओ असा प्रतीक यांचा प्रवास
प्रतीक दोशी हे सिंगापूर मॅनेजमेंट स्कूलचे ग्रॅज्युएट आहेत. पंतप्रधान कार्यालयात काम करण्याआधी प्रतीक यांनी गुजरातमध्ये मोदी मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री कार्यालयात रिसर्च असिस्टंट म्हणून काम केलेलं आहे. पीएमओ वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, ते पीएमओच्या रिसर्च आणि स्ट्रॅटेजी विंगमध्ये काम करतात. भारत सरकारच्या (बिझनेस अलॉकेशन) नियम 1961 च्या संदर्भात पंतप्रधानांना सचिव म्हणून मदत करणं हा त्यांच्या कामाचा भाग आहे. रिसर्च आणि स्ट्रॅटेजीपुरतं त्यांचं काम मर्यादित आहे. थोडक्यात दोशी हे पंतप्रधान मोदींचे डोळे आणि कान असल्यासारखं काम करतात.
बंगळुरूच्या घरी साध्या पद्धतीने विवाह
निर्मला यांच्या बंगळुरूच्या घरीच हा लग्न सोहळा आयोजित करण्यात आला होता. नातेवाईक आणि मित्र परिवाराच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या लग्न सोहळ्यात राजकीय क्षेत्रातील व्यक्तींचा सहभाग नव्हता. निर्मला सीतारमण यांची मुलगी परकला वांगमयीचं प्रतीक दोशीसोबत विधीवत लग्न झालं. उडुपी अदामारू मठाच्या संतांनी वर आणि वधूला आशिर्वाद दिला.