नीता अंबानीं यांना ‘स्पोर्ट्स लीडर ऑफ द इयर’ पुरस्कार, रिलायन्स फाऊंडेशचाही ‘या’ पुरस्काराने गौरव

रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा नीता मुकेश अंबानी यांना सोमवारी नवी दिल्लीत 'स्पोर्ट्स लीडर ऑफ द इयर-फिमेल' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

    नवी दिल्ली: रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा नीता अंबानी यांना CII स्कोअरकार्ड 2023 कार्यक्रमात ‘स्पोर्ट्स लीडर ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नीता अंबानी यांना सोमवारी नवी दिल्लीत भारताची क्रीडा क्षेत्रला पुढे नेण्यासाठी त्यांच्या अनुकरणीय नेतृत्वासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर, रिलायन्स फाऊंडेशनलाही क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्टतेचा दर्जा स्थापित करण्यासाठी ‘भारतातील सर्वोत्कृष्ट कॉर्पोरेट प्रमोटिंग स्पोर्ट्स’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

    CII स्कोअरकार्ड 2023 कार्यक्रमात भारताची क्रीडा क्षेत्राला पुढे नेण्यात त्यांच्या अनुकरणीय नेतृत्वासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. यासोबतच रिलायन्स फाऊंडेशनला क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्टतेचा दर्जा प्रस्थापित केल्याबद्दल ‘बेस्ट कॉर्पोरेट प्रमोटिंग स्पोर्ट्स इन इंडिया’ पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले.

    बीसीसीआयचे सचिव आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह यांनाही त्यांच्या असामान्य कामगिरीसाठी ‘बेस्ट स्पोर्ट्स बिझनेस लीडर’ पुरस्कार देण्यात आला आहे. तर रॉयल चॅलेंजर बंगलोर (RCB) ला स्पोर्ट्स फ्रँचायझी ऑफ द इयर पुरस्कार देण्यात आला आहे. त्याचबरोबर खेळांना प्रोत्साहन देणारे सर्वोत्कृष्ट राज्य म्हणून तामिळनाडूचा गौरव करण्यात आला आहे.