girl wearing mask

भारतात H3N2 व्हायरसच्या नव्या संसर्गाने चिंता वाढवली आहे. त्याचा वाढता प्रादुर्भाव पाहता गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन निती आयोगानं केलं आहे.

गेल्या काही दिवसापासुन देशात H3N2 व्हायरसने धुमाकुळ घातला आहे. दिवसेंदिवस हा इन्फ्लूएंझा संसर्ग देशात घातक ठरत आहे. या आजारामुळे नुकतचं हरियाणा आणि कर्नाटकमध्ये दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत H3N2 सह वेगवेगळ्या फ्लूची लागण झालेले तीन हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभुमीवरआज NITI आयोगाची राज्यांच्या आरोग्य विभागांसोबत बैठक पार पडली. यावेळी गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन निती आयोगाकडुन करण्यात आलं.

देशात वाढतोय संसर्ग

भारतात H3N2 इन्फ्लूएंझा विषाणूचा (H3N2 Virus) संसर्ग दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. सध्या देशात सर्दी, ताप आणि खोकला या आजाराच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. हा नवा व्हायरस असून ICMR नं हा विषाणू H3N2 इन्फ्लूएंझा व्हायरस असल्याची माहिती दिली आहे. सर्दी, ताप, खोकला आणि जुलाब ही H3N2 इन्फ्लूएंझा संसर्गाची लक्षणे आहेत. H3N2 इन्फ्लूएन्झाचे जानेवारी महिन्यात 1,245 रुग्ण आढळले. फेब्रुवारीमध्ये 1,307 तर 1 ते 9 मार्चपर्यंत 486 रुग्ण आढळले आहेत.

एक लाखाहून अधिक लोक तापामुळे हैरान

या वर्षी 10 लाखांहून अधिक लोकांना तीव्र श्वसन आजार/इन्फ्लूएंझा (ARI/ILI) ने बाधित केले आहे. जानेवारीमध्ये 3,97,814 आणि फेब्रुवारीमध्ये 4,36,523 आणि मार्चच्या पहिल्या आठवड्यात 1,33,412 लोकांना संसर्ग झाला. यावर्षी जानेवारीत 7041, फेब्रुवारीत 6919 आणि 9 मार्चपर्यंत 1866 रुग्णांना दाखल करावे लागले. सह-विकार असलेल्या तरुण, मुले आणि वृद्धांनी जास्तीत जास्त सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. मार्चअखेर संसर्ग कमी होण्याची अपेक्षा आहे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, डिसेंबरपासून सीझनल फ्लूचे रुग्ण येत आहेत. H3N2 संसर्गाचा प्रादुर्भावही वाढत असल्याचे दिसून येत आहे. मंत्रालयाला आशा आहे की मार्चच्या अखेरीस संसर्गाचा प्रसार कमी होईल. सरकार आंतरमंत्रालयीन बैठकही घेणार आहे. राज्यांमध्ये पुरेसे H3N2 औषध आहे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले की, H3N2 साठी जागतिक आरोग्य संघटनेने शिफारस केलेले औषध Oseltamivir सरकार मोफत पुरवते. राज्यांमध्ये या औषधाचा पुरेसा साठा आहे. मंत्रालयाचे म्हणणे आहे की, रिअल-टाइम आधारावर एकात्मिक रोग देखरेख कार्यक्रम (IDSP) नेटवर्कद्वारे हंगामी इन्फ्लूएंझाच्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.