२०२४ पर्यंत देशात २६ ग्रीन एक्सप्रेस-वे: गडकरी

२०२४च्या समाप्तीपूर्वी देशातील रस्ते पायाभूत सुविधा अमेरिकेशी स्पर्धा करेल. नितीन गडकरी म्हणाले, “सध्या भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) ची आर्थिक स्थिती अतिशय मजबूत आहे. मी सभागृहात हे ऑन रेकॉर्ड सांगत आहे की, मी दरवर्षी ५ लाख कोटी रुपयांचे रस्ते बांधू शकतो. आमच्याकडे पैशांची कमतरता नाही.

    नवी दिल्ली -देशात २६ ग्रीन एक्स्प्रेस हायवे २०२४ संपण्याआधी बांधले जातील. त्यावर १३० किमी प्रतितास या वेगाने प्रवास पूर्ण होऊ शकेल. रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी संसदेत ही माहिती दिली. त्यांनी दावा केला की, २०२४च्या समाप्तीपूर्वी देशातील रस्ते पायाभूत सुविधा अमेरिकेशी स्पर्धा करेल.
    नितीन गडकरी म्हणाले, “सध्या भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) ची आर्थिक स्थिती अतिशय मजबूत आहे. मी सभागृहात हे ऑन रेकॉर्ड सांगत आहे की, मी दरवर्षी ५ लाख कोटी रुपयांचे रस्ते बांधू शकतो. आमच्याकडे पैशांची कमतरता नाही. संसदेतील कोणत्याही पक्षाच्या खासदाराला विचारा, ज्याने माझ्याकडे रस्ता बांधण्यासाठी पैसे मागितले, त्याला मी पैसे दिले आहेत. मी कोणत्याही पक्षाच्या खासदाराला नकार दिला नाही.

    ते म्हणाले, ‘NHAIला AAA रेटिंग मिळाले आहे. अलीकडेच दोन बँकांचे अध्यक्ष माझ्याकडे आले आणि दोघांनी मला २५-२५ हजार कोटी रुपयांचे कर्ज देण्याचा प्रस्ताव ठेवला. मला हे पैसे नुकतेच ६.४५ % व्याजदराने मिळाले आहेत. त्यामुळे रस्ते बांधण्यासाठी NHAIकडे पुरेसा पैसा आहे.गडकरी म्हणाले की, सध्या आमच्याकडे टोल वसूल करण्याची यंत्रणा आहे, मात्र आम्ही दोन पर्यायांवर काम करत आहोत. पहिली उपग्रह-आधारित टोल-प्रणाली आहे, ज्यामध्ये कारमध्ये GPS स्थापित असेल आणि त्यातून टोल आपोआप कापला जाईल.