कुतुबमिनार परिसर उत्खननाबाबत कोणताही निर्णय झाला नाही : सांस्कृतिक मंत्री

सांस्कृतिक मंत्री जीके रेड्डी यांनी कुतुबमिनार संकुलात भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) ने उत्खनन केल्याबद्दलच्या प्रसारमाध्यमांच्या वृत्तांचे खंडन केले आहे. असा कोणताही निर्णय झाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले.

    ते म्हणाले की, प्रसारमाध्यमांमध्ये सुरू असलेल्या अशा बातम्या निराधार आहेत. विशेष म्हणजे रविवारी भारतीय पुरातत्व विभाग कुतुबमिनार संकुलात उत्खनन करणार असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये आल्या होत्या. सध्या काशीच्या ज्ञानवापी मशिदीपासून सुरु झालेला हा वाद आता मथुरा ताजमहालसह कुतुबमिनारपर्यंत येऊन पोहचला आहे.

    नाव बदलण्याच्या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांची निदर्शने
    विशेष म्हणजे कुतुबमिनारचे नाव बदलण्याची मागणीही हिंदू संघटनांनी नुकतीच केली होती. यानंतर हिंदू संघटनांशी संबंधित काही कार्यकर्त्यांनी तेथे हनुमान चालिसाचे पठण केले. या हिंदू संघटनांनी कुतुबमिनारचे नाव बदलून विष्णूस्तंभ करण्याची मागणी केली होती. याशिवाय कुतुबमिनारमध्ये ठेवलेल्या गणेशमूर्तींबाबतही वाद झाला आहे. कुतुबमिनारमध्ये मूर्ती योग्य ठिकाणी ठेवाव्यात आणि तेथे पूजा-आरती करावी, अशी मागणी मेहरौली येथील भाजप नगरसेविका आरती सिंह यांनी केली होती.