185 illegal liquor sellers were registered and seized goods worth 40 lakhs

नोएडा आयटी पार्कमध्ये (Noida It Park) दारू मिळावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून अनेक वर्ष होत होती. वर्ष २०२३ च्या सुरुवातीलाच नोएडा प्राधिकरणाने आयटी पार्कमधील कर्मचाऱ्यांची ही मागणी मान्य केली आहे.

    नोएडा: आयटी कंपन्यांमधील कर्मचारी अनेक तास एका जागेवर बसून काम करत असतात. या कर्मचाऱ्यांच्या विरंगुळ्यासाठी  आयटी कंपन्यांकडून विविध सुविधा दिल्या जातात. चांगला पगार, भत्ता यासोबतच कर्मचाऱ्यांच्या (IT Employees ) मनोरंजनासाठी जिम, स्पोर्ट्स क्लब आणि रेस्टॉरंट अशा सुविधा आयटी कंपन्यांच्या परिसरात उपलब्ध असतात.  नोएडातील आयटी पार्कमध्ये (Noida IT Park) काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना श्रमपरिहारासाठी दारू (Serving Liquor In Noida IT Park) हवी होती. नोएडा आयटी पार्कमध्ये दारू मिळावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून अनेक वर्ष होत होती. वर्ष २०२३ च्या सुरुवातीलाच नोएडा प्राधिकरणाने आयटी पार्कमधील कर्मचाऱ्यांची ही मागणी मान्य केली आहे.

    नोएडा प्राधिकारणाने गेल्या वर्षी २८ डिसेंबर रोजी आयटी पार्कमधील सोयी-सुविधांचा आढावा घेणारी बैठक घेतली. यावेळी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांनुसार नवे धोरण तयार करण्यात आले. या नव्या धोरणानुसार आता आयटी पार्कमध्येच मद्याची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या आयटी पार्कमध्ये जे रेस्टॉरंट आहेत, तिथे दारू देण्यासाठी परवानगी मिळाली आहे. अधिकृत परवाने आणि इतर बाबींची पुर्तता झाल्यानंतर आयटी पार्कमध्ये बार चालू होणार आहेत. आयटी पार्कमधील कर्मचाऱ्यांची अनेक वर्षांपासूनची ही मागणी मान्य झाल्यानंतर कर्मचारी आनंद व्यक्त करत आहेत.

    बराच वेळ एकाच जागी काम करायला लागल्यामुळे आयटी कर्मचाऱ्यांना कंटाळा येतो. काम संपल्यानंतर कंटाळा घाळवण्यासाठी काही जण दारूचा आधार घेतात. तसेच आयटी कंपन्यांच्या अनेक क्लाईंट मीटिंगमध्ये दारू असायला हवी, अशी मागणी होती. नोएडा प्राधिकरणाच्या नव्या धोरणामुळे ही मागणी मान्य झाली आहे.

    आयटी कंपन्यांनी सांगितले की, “आयटी कंपन्यातील काम हे घडाळ्याच्या काट्यावर चालते. कंपनीचे कर्मचारी देश, विदेशातील क्लाईंटसाठी दिवसरात्र डेस्कवर एका जागी बसून काम करत असतात. अनेक वेळा छोटासा ब्रेक मिळाला तरी त्यांना रिफ्रेश झाल्यासारखं वाटतं. त्यामुळेच अनेकांनी रेस्टॉरंटमध्ये मद्यही मिळावे, अशी मागणी केली होती. ती आता पूर्ण होत आहे.”

    नोएडा प्राधिकरणाच्या निर्णयानंतर फक्त आयटी कंपन्याच नाही तर गौतम बुद्ध नगरच्या उत्पादन शुल्क विभागानेही आनंद व्यक्त केला. प्राधिकरणाच्या या निर्णयामुळे आता महसूल वाढेल, अशी प्रतिक्रिया उत्पादन शुल्क अधिकारी आरबी सिंह यांनी दिली. ते म्हणाले की, नोएडा हे आयटी कंपन्यांसाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहे.