
टाटा समूह आता आयफोनही बनवणार आहे. अॅपल पुरवठादार विस्ट्रॉनने आपला व्यवसाय मजबूत केला आहे. विस्ट्रॉन यापुढे आयफोन बनवणार नाही. ही तैवानची कंपनी टाटा समूहाला आपला प्लांट विकण्याच्या तयारीत आहे. प्लांट बंगळुरूच्या बाहेर नरसापुरा येथे आहे.
आता लवकरच तुम्हाला TATA कंपनी निर्मित आयफोन (iPhone) बाजारात पाहायला मिळणार आहे. खरं तर, भारतात अॅपलचा आयफोन बनवणाऱ्या विस्ट्रॉन (Wistron Corp.) या कंपनीने भारतात आयफोनचे उत्पादन थांबवले आहे. विस्ट्रॉनचा बेंगळुरूतील प्लांट टाटा समूहाला विकण्याची तयारी सुरू आहे. Foxconn आणि Pegatron भारतात ऍपल उत्पादने बनवण्यासाठी त्यांच्या व्यवसायाचा झपाट्याने विस्तार करत असताना विस्ट्रॉन कॉर्पोरेशन भारतातून आपला गाशा गुंडाळण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे भविष्यात आता TATA कंपनी निर्मित आयफोन बघायला मिळणार आहे.
‘या’ कारणामुळे विस्ट्रॉननं उत्पादन थांबवलं
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अॅपलच्या अटींच्या आधारे विस्ट्रॉनला येथे व्यवसाय करून नफा मिळत नव्हता. भारतात अॅपलच्या व्यवसायातून पैसे कमवू न शकल्यानंतर आता कंपनीने आपला व्यवसाय बंद केला आहे. विस्ट्रॉनने 2008 मध्ये भारतीय बाजारपेठेत आपला व्यवसाय सुरू केला होता. कंपनीने सुरुवातीला लॅपटॉप आणि पीसी इत्यादींसाठी उत्पादन दुरुस्ती युनिट सुरू केले. यानंतर, 2017 मध्ये, कंपनीने आपला व्यवसाय पुढे नेला आणि आयफोन बनवण्यास सुरुवात केली.
टाटाकडून आयफोन 15 च्या मॉडेलची चाचणी
टाटा समूह सध्या iPhone 15 चे मॉडेल असेंबल करण्यासाठी चाचणी करत आहे. टाटा समूह लवकरच हा विस्ट्रॉन प्लांट ताब्यात घेईल, त्यानंतर भारताला अॅपल उत्पादनांसाठी पहिली स्वदेशी उत्पादन कंपनी मिळेल. टाटा समूह आणि विस्ट्रॉनमधील हा करार अद्याप पूर्ण व्हायचा आहे, परंतु टाटाच्या कार्यकारिणीने कोलारच्या विस्ट्रॉन युनिटमध्ये काम हाती घेतले आहे. तैवानीच्या असलेल्या विस्ट्रॉन कंपनीचा अॅपल निर्मीतीचा प्लांट बेंगळुरूतील नरसापुरा येथेआहे. तर, बेंगळुरूजवळील कोलार येथील विस्ट्रॉन कॉर्पोरेशनचे आयफोन असेंब्ली युनिट टाटा समूहाला विकण्याची तयारी सुरू आहे.