
बजेटवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. म्हणाले की, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी इन्फ्रास्टक्चर ला जास्त प्राधान्य दिलं आहे. बजेटही खूप मोठा झाला आहे. यामुळे येणाऱ्या काळात वर्ल्ड स्टॅन्डर्ड रोड बनविण्याचं उद्दिष्ट पूर्ण होईल.
नवी दिल्ली : देशातील पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असून त्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात आज वेगवेगळ्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. देशातील वाहतुकीचे सुलभीकरण करण्यात येणार असून त्यासाठी ट्रान्सपोर्ट इन्फ्रास्टक्चर प्रोजेक्टच्या विकासासाठी 75 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
दरम्यान या बजेटवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. म्हणाले की, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी इन्फ्रास्टक्चर ला जास्त प्राधान्य दिलं आहे. बजेटही खूप मोठा झाला आहे. यामुळे येणाऱ्या काळात वर्ल्ड स्टॅन्डर्ड रोड बनविण्याचं उद्दिष्ट पूर्ण होईल. खूप चांगल बजेट अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिलं आहे, यासाठी मी त्यांचं अभिनंदन करतो, असं गडकरी म्हणाले.
अर्थसंकल्पात वाहन क्षेत्रासाठी मोठ्या गोष्टी
2023 च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी वाहन क्षेत्रासाठी मोठ्या गोष्टी सांगितल्या आहेत. ज्यामध्ये वाहन बदलीला प्राधान्य दिले जाईल. वाहनांच्या बदल्यात जुन्या वाहनांची भंगारातून विल्हेवाट लावली जाईल. याचा सर्वात मोठा फायदा प्रदूषण कमी करण्यात होणार आहे. ज्यामुळे ग्रीन वातावरण निर्माण होण्यास मदत होईल.
दुसरी मोठी गोष्ट म्हणजे केंद्र सरकार राज्यांना मदत करेल. जेणेकरून राज्यांनाही जुन्या वाहनांच्या जागी नवीन वाहने आणता येतील. या अर्थसंकल्पातील हे महत्त्वाचे पाऊल आहे. ज्यामध्ये सध्याची जुनी रुग्णवाहिका बदलण्यात येणार आहे, जी प्रदूषण वाढवण्यात मोठी भूमिका बजावते. यातून मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
तिसरी गोष्ट म्हणजे 2023 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात मोटारगाड्या स्वस्त होणार असल्याची घोषणाही करण्यात आली आहे. ज्याचा थेट फायदा सामान्य माणसाच्या खिशात होईल आणि देशातील उत्पादन क्षमता वाढवता येईल.
चौथे, इलेक्ट्रिक वाहनांबाबत सरकारचा अतिशय सकारात्मक दृष्टिकोन दिसून आला आहे. या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सरकार इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती रास्त ठेवून बहुतांश ग्राहकांना इलेक्ट्रिक वाहनांकडे वळवण्याचा प्रयत्न करणार आहे.