आता आधारकार्डनेही करता येणार यूपीआय पेमेंट; गुगल पे वापरण्यासाठी भासणार नाही डेबिट कार्डची गरज

गुगल पे (Google Pay) युजर्ससाठी चांगली बातमी आहे. आता यूपीआय पेमेंट (UPI Payments) करणे आणखी सोपे झाले आहे. गुगल पे युजर्ससाठी आता युपीआय पेमेंट करण्यासाठी डेबिट कार्डची आवश्यकता नाही. तुम्ही आधार कार्डच्या मदतीने युपीआय पेमेंट करू शकता. त्यामुळे आता यूपीआय अॅक्टिव्ह करण्यासाठी युजर्सना डेबिट कार्डची गरज नाही.

    नवी दिल्ली : गुगल पे (Google Pay) युजर्ससाठी चांगली बातमी आहे. आता यूपीआय पेमेंट (UPI Payments) करणे आणखी सोपे झाले आहे. गुगल पे युजर्ससाठी आता युपीआय पेमेंट करण्यासाठी डेबिट कार्डची आवश्यकता नाही. तुम्ही आधार कार्डच्या मदतीने युपीआय पेमेंट करू शकता. त्यामुळे आता यूपीआय अॅक्टिव्ह करण्यासाठी युजर्सना डेबिट कार्डची गरज नाही.

    युजर्स त्याच्या आधार क्रमांक वापर करून यूपीआय पेमेंट नोंदणी करता येते. गुगल पे युजर्ससाठी आणखी एक सुविधा सुरू करण्यात आली आहे. गुगल पेने नवीन ‘आधार ऑथेंटिकेशन ‘यूपीआय’ फीचर लाँच केले आहे. त्यामुळे आता गुगल पेने यूपीआय पेमेंट करण्यासाठी डेबिट कार्डची गरज नाही. तुम्ही आधार कार्डने व्हेरिफिकेशन करून पेमेंट करु शकता. गुगल इंडियाने युआयडीएआयसोबत आधार क्रमांकावर आधारित यूपीआय पेमेंटसाठी करार केला आहे.

    यूपीआय पेमेंटमध्ये होईल वाढ

    भारतातील 99.9 टक्के लोकांकडे आधारकार्ड आहे. त्यामुळे, आधारकार्डद्वारे UPI सक्रिय केल्याने आधारचा वापर वाढू शकतो. त्यासोबतच डिजिटल पेमेंटही वाढेल. आधार क्रमांकावरून यूपीआय सेवा सक्रिय करण्यासाठी, युजर्सकडे तुमच्या बँक खात्याशी लिंक केलेला मोबाइल नंबर असणे आवश्यक आहे. जर तुमचा मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक नसेल तर तुम्ही या सुविधेचा लाभ घेऊ शकणार नाही.

    गुगल अॅपमध्ये जाऊन यूपीआय ऑनबोर्ड पर्यायावर क्लिक करा. यानंतर तुमच्या आधार क्रमांकाचे शेवटचे 6 अंक टाका. यानंतर, युजरला वन टाइम पासवर्ड म्हणजेच ओटीपी समाविष्ट करावा लागेल, ज्यामुळे तुमच्या बँकेचे प्रमाणीकरण होईल. यानंतर तुमचे युपीआय पेमेंट सक्रिय होईल.