प्रेषित मोहम्मद यांचा अवमान प्रकरण; नुपूर शर्मा, नवीनला भिवंडी पोलिसांचे समन्स

भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी महाराष्ट्राच्या भिवंडी पोलिसांनी सोमवारी बोलावून जबाब नोंदवण्यास सांगितले आहे. एका पोलिस अधिकाऱ्याने रविवारी ही माहिती दिली(Nupur Sharma, Naveen summoned by Bhiwandi police).

    याशिवाय, भाजपाचे हकालपट्टी केलेले कार्यकर्ता नवीन कुमार जिंदाल यांनाही ठाणे जिल्ह्यातील भिवंडी पोलिसांनी कथित वादग्रस्त ट्विटबद्दल 15 जून रोजी त्यांचे जबाब नोंदवण्यास सांगितले आहे. रझा अकादमीच्या प्रतिनिधीने 30 मे रोजी दिलेल्या तक्रारीनंतर भिवंडी पोलिसांनी नुपूर शर्माविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

    पोलिसांनी नवीन कुमार जिंदाल यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी, ठाण्यातील मुंब्रा पोलिसांनी नुपूर शर्माला 22 जून रोजी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी तिची जबानी नोंदवण्यासाठी त्यांच्यासमोर हजर राहण्यास सांगितले होते.