अकाली दलाच्या अध्यक्षांचे केजरीवाल यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य

केजरीवाल हे प्रत्येक आठवड्याला भगवंत मान यांना दारुचा बॉक्स पाठवतात. त्यांना म्हणतात की, सरकारी ऑफिसमध्ये बसा आणि मजा करा. तसेच, ते स्वतः पंजाबमधले सरकार चालवतात, असे सुखबीर सिंग म्हणाले. यामुळे वादंग निर्माण झाला आहे.

    अकाली दला(Akali Dal)च्या अध्यक्षांनी आम आदमी पक्षा(Aam Aadmi party)चे प्रमुख अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. त्याच्या या वक्तव्याने खळबळ माजली असून पंजाब(Punjab)चे राजकारण पुन्हा ढवळून निघण्याची शक्यता आहे. दिल्ली(Delhi)तून दर आठवड्याला दारूचा बॉक्स (Box Of Liquor) भगवंत मान यांना पुरवला जातो. अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग (Sukhbir Singh) यांनी पंजाबमधले सरकार दिल्लीतून अरविंद केजरीवाल चालवतात, असा आरोपही केला आहे.

    केजरीवाल हे प्रत्येक आठवड्याला भगवंत मान यांना दारुचा बॉक्स पाठवतात. त्यांना म्हणतात की, सरकारी ऑफिसमध्ये बसा आणि मजा करा. तसेच, ते स्वतः पंजाबमधले सरकार चालवतात, असे सुखबीर सिंग म्हणाले. यामुळे वादंग निर्माण झाला आहे.

    पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या मृत्यूला आप सरकार जबाबदार असल्याचा आरोपही सुखबीर सिंग यांनी केला होता. सिद्धूची सुरक्षा काढून घेऊन सरकारने त्याच्या शत्रूंनी सावध केले, म्हणून तो मेला, असे सिंग म्हणाले होते.