विद्यार्थिनींचा आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणी दोन तरुणांना अटक

पोलिसांनी तात्काळ व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या तरूणीला ताब्यात घेतलं होतं. चौकशी दरम्यान तिने व्हिडीओ आपल्या मित्राला पाठवल्याचं सांगितलं होत. तिनं दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन तरुणांना हिमाचल प्रदेशमधील रोहा येथून अटक केली.

    पंजाब : चंदीगड विद्यापिठातील 60 विद्यार्थिनींच्या आक्षेपार्ह व्हिडीओ प्रकरणी पोलिसांनी दोन तरूणांना अटक केली आहे. या प्रकरणी आधीच एका मुलीला अटक करण्यात आलं होत. रंकज वर्मा आणि सनी मेहता अशी अटकेतील तरुणांची नाव आहेत. तरुणीच्या माहितीवरून पोलिसांच्या पथकाने हिमाचल प्रदेशमधून या दोघांनाही ताब्यात घेतलं.

    चंदीगड विद्यापिठातील 60 विद्यार्थिनींचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल (Viral Vide) झाल्याने काल एकच खळबळ उडाली होती. ही घटना उघडकीस येताच आठ विद्यार्थिनींनी आत्महत्या करण्याचा देखील प्रयत्न केल्याचं बोलंल जात होतं. धक्कादायक बाब म्हणजे त्याच विद्यापिठातील एका विद्यार्थिनीनं इतर विद्यार्थिनींचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल केल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी विद्यापिठातील विद्यार्थिनींनी गोंधळ घालत तिव्र निदर्शने केली होती. पोलिसांनी तात्काळ व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या तरूणीला ताब्यात घेतलं होतं. चौकशी दरम्यान तिने व्हिडीओ आपल्या मित्राला पाठवल्याचं सांगितलं होत. तिनं दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन तरुणांना हिमाचल प्रदेशमधील रोहा येथून अटक केली.