पोटनिवडणुकांनंतर काँग्रेसमध्ये फेरबदल होणार?

गेल्या काही दिवसांपूर्वी घडलेल्या घडामोडींवरून महाराष्ट्र काँग्रेसमधील (Maharashtra Congress) अंतर्गत वाद टोकाला गेल्याचे दिसत होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यात निर्माण झालेला तेढ आणि त्यानंतर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील (H.K.Patil) यांनी मध्यस्थी केल्यानंतर हा वाद शमला असल्याचे सांगण्यात येत आहे.

  नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपूर्वी घडलेल्या घडामोडींवरून महाराष्ट्र काँग्रेसमधील (Maharashtra Congress) अंतर्गत वाद टोकाला गेल्याचे दिसत होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यात निर्माण झालेला तेढ आणि त्यानंतर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील (H.K.Patil) यांनी मध्यस्थी केल्यानंतर हा वाद शमला असल्याचे सांगण्यात येत आहे. पण आता कसबा (Kasba Peth Bypoll) आणि चिंचवड विधानसभा (Chinchwad Bypoll) पोटनिवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये फेरबदल होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

  पटोले-थोरात वाद काँग्रेसश्रेष्ठींपर्यंत गेला होता. त्यानंतर आता राजधानी दिल्लीतून महाराष्ट्र काँग्रेसमध्ये बदल होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केरळचे ज्येष्ठ नेते रमेश चेन्निथला यांना महाराष्ट्र काँग्रेसच्या संकटावर अहवाल देण्यास सांगितले आहे. दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्यावर विशेष टिप्पणी केली आहे. विधिमंडळ पक्षनेते पदावर राहायचे नाही, ही बाब तुम्ही आमच्यावर सोडा, असे म्हटले असल्याचे सांगण्यात आले आहे.

  पक्षाध्यक्ष खर्गे घेणार निर्णय

  पक्षश्रेष्ठींनी महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांना संदेश देऊन थोरात यांच्याकडे पाठवले होते. त्यात रायपूरमध्ये होणारे अधिवेशन व महाराष्ट्रातील पोटनिवडणुकांपर्यंत आपण सहकार्य करावे. त्यानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे महाराष्ट्राबाबत निर्णय करणार आहेत, अशी माहिती दिली जात आहे.

  काँग्रेस अध्यक्षांसोबत चर्चा करणार

  दरम्यान, यापूर्वी थोरात यांनी प्रत्येक संघटनेत अनेक प्रश्न असतात. तसेच आमच्याही संघटनेत आहेत. माझे काही प्रश्न आहेत. त्या प्रश्नांवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबत बसून चर्चा करावी, असे एच. के. पाटील यांनी म्हटले आहे. त्यामुळे चर्चा होईल. काही मुद्दे आहेत, त्यावर चर्चा होईल, असे थोरात यांनी म्हटले आहे.