अरे देवा, पाकिस्तानच्या आर्थिक संकटात दररोज नवी भर, आता इराणला 4 लाख कोटींचा दंड द्यावा लागणार

आणखी एक नवं संकट पाकिस्तानसमोर उभं टाकलंय. आता इराणनं पाकिस्तानवर भरभक्कम दंड ठोठावण्याची धमकी दिली आहे. इराणनं पाकिस्तानवर 18 अब्ज डॉलर्सचा दंड ठोठावणार असल्याची धमकी दिलीय.

    इस्लामाबाद : आर्थिक संकट, महागाई, भूकबळी आणि वीजेची समस्या भेडसावत असलेल्या पाकिस्तानवर (Pakistan) संकटांची मालिका कायम असल्याचं दिसतंय. एकापाठोपाठ एक दररोज नवनव्या अडचणींचा सामना आता पाकिस्तान सरकारला (Government) करावा लागतोय. कर्जासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्था आणि पाश्चिमात्य देशांसमोर भीकेचा कटोरा घेून गेलेल्या पंतप्रधान शहबाज यांना अद्याप यश मिळालेलं नसतानाच, आता आणखी एक नवं संकट पाकिस्तानसमोर उभं टाकलंय. आता इराणनं पाकिस्तानवर भरभक्कम दंड ठोठावण्याची धमकी दिली आहे. इराणनं पाकिस्तानवर 18 अब्ज डॉलर्सचा दंड ठोठावणार असल्याची धमकी दिलीय. पाकिस्तानच्या सध्याच्या आर्थिक स्थितीचा विचार केला तर ही रक्कम 48 हजार 960 कोटींच्या घरात जाणार आहे. ही दंडाची रक्कम इतकी जास्त आहे की, पाकिस्तान सरकार सध्या एवढी मोठी रक्कम उभी करण्याच्या स्थितीतही नसल्याचं सांगण्यात येतंय.

    एवढ्या मोठा दंड आकारण्याचं कारण काय?

    इराणनं दिलेल्या दंडाच्या धमकीचं कारण आहे गॅस पाईपलाईन. 2009 साली पाकिस्तान आणि इराममध्ये गॅस पाईपलाीन टाकण्याबाबत एक करार झाला होता. त्यावेळी पाकिस्तानात पीपुल्स पार्टीचं सरकार होतं. पीपीपी असंही या पार्टीला संबोधण्यात येतं. पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती असीफ अली जरदारी यांची ही पार्टी आहे. या करारानुसार पाकिस्तानला त्यांच्या देशात असलेल्या 800 किमी अंतारवर ही पाईपलाईन टाकायची होती. हे काम पूर्ण झाल्यानंतर इराम पाकिस्तानला गॅस पुरवणार होता. मात्र आता 14 वर्ष झालेत मात्र हे काम अपूर्णच आहे.

    अमेरिकेमुळे काम अपूर्ण

    या पाईपलाईनचं काम पूर्ण का झालं नाही, याचं कारण आहे अमेरिका. याच काळात अमेरिकेनं इराणवर प्रतिबंध लावले होते, त्या कारणामुळं पाकिस्तानला हा प्रकल्प अमेरिकनं पूर्ण करु नये, असे सांगत रोखले होते. तर दुसरीकडं इरामनं त्यांच्या देशातील पाईपलाईन टाकण्याचं काम खूप वर्षांपूर्वीच पूर्ण केलं आहे. त्यानंतर गेली 14 वर्ष इराण ज्याही वेळी पाकिस्तानला याबाबत विचारणा करीत असे, त्यावेळी अमेरिकेचं कारण देत पाकिस्तान हा मुद्दा टाळीत असे. पाईपलाईन टाकायला आपण तयार आहोत, मात्र अमेरिका प्रतिबंधाचं कारण पाकिस्तान सातत्यानं देत होतं. पाकिस्तान करत असलेल्या चालढकलीनं वैतागलेल्या इराणनं आता पाकिस्तानवर दंड ठोकण्याचा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येतंय.

    इराणने यासाठी पाकिस्तानला मार्च 2024चा अल्टिमेटम दिला आहे. तोपर्यंत जर पाकिस्ताननं ही पाईपलाईन टाकली नाही, तर इराण ही भरभक्कम दंडाची रक्कम पाककडून वसूल केल्याशिवाय राहणार नाही. असं सांगण्यात येतंय. जानेवारी 2023 मध्येच इराणच्या अधिकाऱ्यांनी काम वेळेवर पूर्ण करा, असा इशारा पाकिस्तानला आधीच दिला आहे.

    सध्या पाकिस्तानची दयनीय स्थिती

    पाकिस्तानाता सध्या अत्यंत दयनीय स्थिती आहे. अन्नधान्य, दैनंदिन वस्तू मिळवण्यासाठीही पाकिस्तानी जनतेला सातत्यानं संघर्ष करावा लागतोय. पाकिस्तानात सध्या गव्हाटं पीठ 150 रुपये किलो, चिकन 650 रुपये किलो, दूधही 150 रुपये लिटरनं विकलं जातंय. परदेशी गंगाजळी संपल्यानं आता आयात करण्याची पाकिस्तानची क्षमताही संपल्याचं सांगण्यात येतंय. पेट्रोलो-डिझेलच्या किमतीही प्रचंड कडाललेल्या आहेत. तर गॅस सिलिंडर सध्या 10,000 पाकिस्तानी रुपयांना विकत घ्यावा लागतोय.