अरे देवा, हे काय झालं? या ठिकाणी सोनं मिळतंय 1. 86 लाख रुपये तोळ्यानं, वाचाल तर व्हाल हैराण

पाकिस्तान (Pakistan) सध्या अशाच आार्थिक संकटाचा सामना करतंय. दिवसेंदिवस तिथली परिस्थिती अधिकाधिक बिकट होताना दिसतेय. अगदी गव्हासाठी आणि पिठासाठी लोकं एकमेकांशी हाणामारी करताना पाहयाला मिळतायेत.

  नवी दिल्ली – सोन्याचे (Gold) दर दिवसेंदिवस गगनाला भिडतायेत. जगात आर्थिक  (Economics) मंदीची लाट आल्याचं चित्र अतानाच सोन्याचे भाव चांगलेच कडाडले आहेत. या वर्षी भारतात (India) सोनं ५८ हजारांवर जाऊन पोहचलंय. येत्या दोन तीन वर्षांत सोनं ९० एक हजारांवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. जगात सोन्याकडे स्थिर संपत्ती म्हणून पाहण्यात येतं. त्यामुळे आर्थिक मंदीच्या काळात सोन्याचे दर वाढतायेत. जे देश आर्थिक संकटात सापडले आहेत. तिथं तर सोन्याचे दर प्रचंडच वधारले आहेत.

  पाकिस्तान (Pakistan) सध्या अशाच आार्थिक संकटाचा सामना करतंय. दिवसेंदिवस तिथली परिस्थिती अधिकाधिक बिकट होताना दिसतेय. अगदी गव्हासाठी आणि पिठासाठी लोकं एकमेकांशी हाणामारी करताना पाहयाला मिळतायेत. खाण्यापिण्याच्या वस्तूंची एवढी महागाई आणि मारामार असलेल्या पाकिस्तानात सोन्य़ाबाबत न बोललेलंच बरं, अशी अवस्था आहे. पाकिस्तानातील सोन्याचे दर आकाश फाडून वर गेले आहेत. पाकिस्तानातील सोन्यात २१ हजार प्रतितोळा वाढ झाली असून, प्रती तोळा सोन्याची किंमत १ लाख ८६, ५०० रुपयांपर्यंत येऊन ठेपलेली आहे. सध्या जगाचा विचार केल्यास सर्वाधिक महाग सोनं सध्या पाकिस्तानात मिळतंय.

  जगातील किंमतीपेक्षाही सोनं महाग

  दुबईत असलेल्या सोन्याच्या किमतीपेक्षा पाकिस्तानातील सोन्याच्या प्रती तोळ्याच्या किंमती या काही हाजारांनी अधिक आहेत. सद्यस्थितीत सोनं खरेदी करणारे अधिक पाकिस्तानी नागरिक हे गुंतवणूकदार आहेत. यापूर्वी हे नागरिक अमेरिकन डॉलर्समध्ये गुंतवणूक करत होते. पाकिस्तानी रुपया घसरत चाललेला असल्यानं भविष्याचा विचार करत आता गुंतवणूकदार सोन्यात इन्वस्टेमेंट करताना दिसतायेत. पाकिस्तानी बाजारात डॉलर्स कमी उपलब्ध झालेत. त्यामुळेही आता सोन्याकडे ओढा वाढलेला दिसतोय.

  भारतात सोन्याच्या किंमती किती

  बुधवारी भारतातील सोन्याच्या बाजारात मात्र १०५ रुपयांनी घट झाली आहे. सोनं भारतात प्रतितोळा ५६,५२६ रुपयांनी मिळतंय. सध्या भारतीय रुपयाची किंमत पाकिस्तानच्या रुपयाच्या तुलनेत २.८३ इतकी आहे.