Petrol With Logo

ल उत्पादक कंपन्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कपात करणार आहेत. अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. कंपन्यांना झालेला तोटा जवळपास भरुन निघाला आहे. तसेच गेल्या तिमाहीत या कंपन्यांनी जोरदार नफा कमाविला आहे.

  नवी दिल्ली : वाहनधारकांसाठी एक महत्त्वाची व आनंदाची बातमी समोर येत आहे. देशात महागाईनं (inflation) सामान्य माणसाचे कंबरडे मोडले असताना, आणि देशात महागाई उच्चांक गाठला असताना, अचानक एक आनंदाची व दिलासादायक बातमी समोर येत आहे. जर तुम्ही वाहनधारक (vehicle owner) असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे. कारण आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि डॉलरचा प्रभाव असला तरी भारतात, लवकरच इंधनाच्या (Petrol Diesel Rate) दर कपातीचा निर्णय होण्याची शक्यता आहे, अशी माहिती समोर येत आहे.

  पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात होणार…

  दरम्यान, सुत्रांच्या माहितीनुसार तेल उत्पादक कंपन्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कपात करणार आहेत. अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. कंपन्यांना झालेला तोटा जवळपास भरुन निघाला आहे. तसेच गेल्या तिमाहीत या कंपन्यांनी जोरदार नफा कमाविला आहे. आज 8 जून रोजी सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचा भाव (Petrol Diesel Rate Today) जाहीर होतो. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलात घसरण झाली. जानेवारी 2023 मध्ये किंमती 80 डॉलर प्रति बॅरलच्या पुढे सरकल्या होत्या. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या भावात जबरदस्त उसळी आली. कच्चे तेल 139 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले. 2008 नंतर कच्चा तेलाची ही उच्चांकी उडी होती.

  तुमच्या शहरातील आज पेट्रोल-डिझेलचे भाव?

  मुंबईमध्ये पेट्रोल 106.40 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर आहे

  नागपूरमध्ये पेट्रोल 106.27 तर डिझेल 92.81 रुपये प्रति लिटर

  नाशिकमध्ये पेट्रोल 106.77 रुपये आणि डिझेल 93.27 रुपये प्रति लिटर

  अहमदनगर पेट्रोल 106.29 तर डिझेल 92.80 रुपये प्रति लिटर

  अकोल्यात पेट्रोल 106.17 रुपये आणि डिझेल 92.72 रुपये प्रति लिटर

  अमरावतीत पेट्रोल 107.48 तर डिझेल 93.94 रुपये प्रति लिटर

  औरंगाबाद 107.98 पेट्रोल आणि डिझेल 95.65 रुपये प्रति लिटर

  जळगावमध्ये पेट्रोल 106.89 आणि डिझेल 93.38 रुपये प्रति लिटर

  कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.26 आणि डिझेल 92.80 रुपये प्रति लिटर

  लातूरमध्ये पेट्रोल 107.19 तर डिझेल 93.69 रुपये प्रति लिटर