हनिमूनची पहिली रात्र अन् पतीचं ‘ते’ सत्य उघड

उत्तर प्रदेशातील शाहजहांपुर जिल्ह्यातील पुवाया पोलीस ठाणे हद्दीतील एका तरुणीची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. तरुणीच्या कुटुंबीयांनी 10 लाख रुपये हुंडा देऊन तिचं लग्न लावून दिलं होतं. मात्र हनिमूनच्या रात्री झालेल्या खुलासानंतर तिला धक्काच बसला.

    लखनऊ : उत्तर प्रदेशातील शाहजहांपुर जिल्ह्यातील पुवाया पोलीस ठाणे हद्दीतील एका तरुणीची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. तरुणीच्या कुटुंबीयांनी 10 लाख रुपये हुंडा देऊन तिचं लग्न लावून दिलं होतं. मात्र हनिमूनच्या रात्री झालेल्या खुलासानंतर तिला धक्काच बसला. यानंतर तरुणीच्या कुटुंबीयांनी पतीसह सात लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

    कुटुंबीयांनी तरुणीचं लग्न खूप थाटामाटात केलं होतं. मात्र ती सासरी पोहोचल्यानंतर झालेला पती नपुंसक असल्याचं तिच्या लक्षात आलं. पोलिसांनी पतीसह सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधिक्षक संजीव वाजपेयी यांनी रविवारी सांगितलं की, पुवाया गावात राहणाऱ्या तरुणीचं लग्न शाहजहापूर निवासी सत्यमसोबत करण्यात आलं होतं. आणि तिच्या लग्नासाठी 10 लाख रुपयांची कॅश आणि हुंडा दिला होता. नवरीची पाठवणी करून सासरीही पाठवण्यात आलं.

    दरम्यान लग्नाच्या पहिल्या रात्री कळालं की, नवरदेव हा नपुंसक आहे. जेव्हा नवरीने याबाबत सासरच्यांना सांगितलं तर नणंद आणि इतरांनी तिला मारहाण केली. सासरच्यांनी तिला जीवे मारण्याची धमकी दिली. तरुणीने पतीवर फसवणुकीसह छळ केल्याचाही आरोप केला आहे.